स्नेहसंमेलनातूनच विद्यार्थ्यांचे भाव विश्व खुलत जाते – अनिल चवळे
स्नेहसंमेलनातूनच विद्यार्थ्यांचे भाव विश्व खुलत जाते - अनिल चवळे
अहमदपूर (गोविंद काळे) : वार्षिक स्नेहसंमेलनातूनच विद्यार्थ्यांचे भाव विश्व फुलले जाते व चाकोरी बद्दल शैक्षणिक वेळापत्रकाच्या बाहेर पडून विद्यार्थी आपल्या मध्ये असलेल्या कलागुणांना सादर करतात त्यामुळेच त्यांच्या मनाचे अंतरंग सर्वांसमोर पटलावर येतात. व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो असे प्रतिपादन प्रा अनिल चवळे यांनी अहमदपूर येथील मॉडेल इंग्लिश स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी मांडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर पांडुरंग कदम हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून रोटरीचे अध्यक्ष राजीव कल्याने, माजी अध्यक्ष शिवशंकर पाटील, माजी सचिव कपिल बिरादार, धनंजय कोत्तावार यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमात पुढे बोलताना प्राध्यापक अनिल चवळे यांनी शाळेमध्ये अभ्यासक्रमाबरोबरच क्रीडा कला पर्यावरण व समाजशास्त्र या विषया मध्ये विद्यार्थ्यांना रुची निर्माण केली पाहिजे असे सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी नाटिका नृत्य ऐतिहासिक मांडणी व कुंभमेळा असे विषय असलेले सादरीकरण केले व उपस्थित यांचे मने जिंकले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मॉडल इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक श्रीराम क्षीरसागर, माध्यमिक चे मुख्याध्यापक विवेक कुमठेकर, उपमुख्याध्यापिका वैशाली ठाकूर, सौ ज्योती क्षीरसागर, सौ कृष्णापुरे मॅडम, अंजली कुलकर्णी, पांचाळ मॅडम, जगताप मॅडम, पवार मॅडम यांच्यासह शाळेतील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रयत्न केले या कार्यक्रमास मोठ्या संख्येने पालक विद्यार्थी उपस्थित होते.
