छत्रपती शंभू राजे शूर तर होतेच परंतु विद्वान साहित्यिक ही होते – डॉ नरसिंह भिकाने

0
छत्रपती शंभू राजे शूर तर होतेच परंतु विद्वान साहित्यिक ही होते - डॉ नरसिंह भिकाने

छत्रपती शंभू राजे शूर तर होतेच परंतु विद्वान साहित्यिक ही होते - डॉ नरसिंह भिकाने

अहमदपूर (गोविंद काळे) : सर्वत्र चर्चेत असणारा ऐतिहासिक चित्रपट छावा हा मानखेड ता.अहमदपूर या ठिकाणी शिवजन्मोत्सव समितीतील सर्व पदाधिकारी, सदस्य,सहायक व ग्रामस्थ तसेच माताभगिनीसाठी दाखवण्यात आला त्याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह यांनी छत्रपती शंभू राजे हे त्यांच्या जीवनातील सर्व लढाया तर जिंकलेच कारण ते शूरवीर तर होतेच परंतु अनेक भाषेत ते पारंगत असणारे व चार ग्रंथ लिहिणारे विद्वान साहित्यिक ही होते असे प्रतिपादन केले.डॉ भिकाने यांनी ग्रामस्थांसाठी मोठ्या स्क्रिनवर छावा हा चित्रपट दाखवला.याचे कारण देताना ते पुढे म्हणाले की मानखेड या छोट्याश्या गावी आमचे तरुण बांधव शिवरायांवरील राज्यस्तरीय वक्तृ वक्तृत्व स्पर्धा सप्ताह हा मोठा कार्यक्रम आठवडाभर घेतात व याच्या आयोजनासाठी रात्रीचा दिवस करतात हे अभिमानास्पद आहे.यामुळे राजांचा इतिहास नवीन पिढी लहानपणापासून ऐकेल व ती आदर्शवत जीवन जगण्यासाठी प्रत प्रयत्नवत असेल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.यावेळी चक्क जनतेमध्ये जमिनीवर बसून सर्वांसोबत डॉ भिकाने यांनी हा चितपट पहिला. हा चित्रपट पाहून राजांसाठी फक्त फक्त अश्रू गाळू नका तर ज्या कारणासाठी त्यांनी बलिदान केले ते सर्वधर्मीय हिंदवी स्वराज्य जोपासा असे सरतेशेवटी डॉ भिकाने यांनी जनतेला आवाहन केले.यावेळी मनवीसे जिल्हासंघटक डॉ यश भिकाने, रमाकांत जाधव,दस्तागिर शेख,बाळू पाटील,उत्तम मुरकुटे,अतिष गायकवाड व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.आपल्या राजांचा इतिहास या चित्रपटाच्या माध्यमातून डॉ भिकाने यांच्यामुळे आम्हाला पाहता आला याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवजन्मोत्सव समितीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!