मालवाहु आयशर टॅम्पो व दुचाकीचा समोरा -समोर अपघात ; दोन युवकांचा जागीच मृत्यु

0
मालवाहु आयशर टॅम्पो व दुचाकीचा समोरा -समोर अपघात ; दोन युवकांचा जागीच मृत्यु

मालवाहु आयशर टॅम्पो व दुचाकीचा समोरा -समोर अपघात ; दोन युवकांचा जागीच मृत्यु

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील शिरूर ताजबंद येथुन जाणाऱ्या ३६१ राष्ट्रीय महामार्गावरील बाह्यवळण रस्त्यावर दि २६ फेब्रुवारी रोजी रात्री ११: ३० वाजता मालवाहु आयशर टॅम्पो व दुचाकीची समोरा-समोर जोराची धडक झाली यात दुचाकी वरील दोन युवकांचा जागीच मृत्यु झाला असुन या घटनेची अहमदपूर पोलीसात अपघाताच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे

याविषयी सविस्तर माहीती अशी की, तालुक्यातील हगदळ येथील पवन भानुदास डुरे वय ३० वर्ष रा हगदळ ता अहमदपूर व रणजित चंद्रकांत मुंढे वय २४ वर्ष रा हगदळ ता अहमदपूर हे दोन युवक काही कामानिमित्त दुचाकीवर शिरूर ताजबंद येथे गेले होते तेथील आपले काम आटपून शिरूर ताजबंद येथुन गावातुन ते हॉटेल शिवनेरी समोरून लातुर कडे जाणाऱ्या ३६१ राष्ट्रीय महामार्गावरील बाह्यवळण रस्त्यावरून महामार्गावर लातुरकडे जात असताना आणि लातुरकडून नांदेडकडे येत असलेला मालवाहु आयशर क्र एम.एच २६ बिई ७५३४ यांची समोरा -समोर दि २६ फेब्रुवारी रोजी रात्री ११ : ३० वाजता जोराची धडक झाली यात दुचाकीवरील दोन्ही युवकांचा जागीच मृत्यु झाला आहे
सदरील अपघात एवढा भयंकर होता की आयशर टॅम्पोने धडक दिल्यानंतर दुचाकी फरपटत जात असताना घर्षण होऊन पेट घेतला त्यात दुचाळी संपूर्ण जळून खाक झाली असुन आयशर टॅम्पो पलटी खाऊन बाजुच्या रोडवर जाऊन पडला आहे
सदरील अपघाताची घटना अहमदपूर पोलीसांना समजताच तात्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा करून दोन्ही मयताचे शासकीय ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले त्यांच्यावर हगदळ येथे दि २७ फेब्रुवारी रोजी दुपारी अत्यंसंस्कार करण्यात आले
या घटनेची अहमदपूर पोलीसात अपघाताच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!