शेतीच्या वादातुन जन्म देणाऱ्या आईचा मुलानेच केला डोक्यात धारदार कुऱ्हाड घालुन खुन

0
शेतीच्या वादातुन जन्म देणाऱ्या आईचा मुलानेच केला डोक्यात धारदार कुऱ्हाड घालुन खुन

शेतीच्या वादातुन जन्म देणाऱ्या आईचा मुलानेच केला डोक्यात धारदार कुऱ्हाड घालुन खुन

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील महादेव वाडी येथील एका मुलाने मद्यधुंद अवस्थेत वडीलोपार्जित शेती आपली आई आपल्या नावावर करून देत नसल्यामुळे आपल्याला जन्म देणारी आई गाढ झोपेत असताना डोक्यात धारदार कुऱ्हाड घालुन जिवे मारल्याची घटना दि २६ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री ०१ : ३० वाजण्याच्या सुमारास घडली असुन मुला विरूद्ध अहमदपूर पोलीसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याविषयी सविस्तर माहीती अशी की, तालुक्यातील महादेववाडी येथील आरोपी विक्रम प्रकाश चामे रा. महादेववाडी ता. अहमदपूर हा गेल्या अनेक वर्षापासुन वडीलोपार्जित शेती आपल्या नावावर करून घेण्यासाठी आईच्या मागे तगादा लावला होता परंतु मयत आई वनिता भ्र प्रकाश चामे वय 55 वर्षे रा. महादेववाडी ता. अहमदपूर ही काही शेती नावावर करून देत नव्हती म्हणुन आरोपी विक्रम याने आपल्या आईचा काटा काढण्याचे ठरविले दि २६ फेब्रुवारी मध्यरात्री ०१ : ३० वाजण्याच्या सुमारास आपली आई गाढ झोपेत असताना धारदार कुऱ्हाड डोक्यात घालुन खुन केला पुरावा नष्ठ करण्यासाठी रक्ताने माखलले घरातील कपडे जाळून टाकले आणी एवढ्यावरच न थांबता मयत आईला फरफटत छतावर घेऊन जाऊन घराच्या पाठीमागे जणांवराच्या गोठ्यात छतावरुन खाली फेकुन दिले त्यानंतर मयत आईची बॉडी गोठ्यात असलेल्या पाण्याच्या हौदात टाकुन देऊन घातपात झाल्याचा बनाव केला.
पोलीसांनी हौदातील मयताची बॉडी बाहेर काढून पंचनामा केला असता मयताच्या मुलावर संशय आल्याने अधिक विचारपुस केली तेव्हा आरोपी विक्रम प्रकाश चामे रा. महादेववाडी ता. अहमदपूर याने आपला गुन्हा कबुल केला असुन कैवल्या भ्र ज्ञानोबा गंगावारे वय 38 वर्षे व्यवसाय घरकाम रा. कुरूळा ता. कंधार जि.नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अहमदपूर पोलीसात भारतीय न्याय संहीता गुरन नं १२७/२०२५ कलम १०३ (१), २३८ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे
पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मनिष कल्याणकर , प्रभारी पोलीस निरिक्षक बि. डि भुसनुर यांच्या मार्गदर्शनाखाली पि. एस आय स्मिता जाधव यांच्यासह पोह बि.पि साळवे, पोना केशव जायभाये, पोकॉ शिवशंकर चोले , पोकॉ शिंदे हे करीत आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!