छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

0
छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

उदगीर (एल.पी.उगीले) :छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालय येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. सी. व्ही. रमन तसेच स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.आर.एम.मांजरे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे सिनेट सदस्य डॉ.विष्णू पवार तसेच रसायनशास्त्रचे विभाग प्रमुख डॉ.एच.ए. तिरपुडे उपस्थित होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी प्रेझेंटेशन व भाषण केले. विष्णू पवार यांनी नवीन टेक्नॉलॉजी आत्मसात करून विद्यार्थ्यांनी पुढील जीवनात वाटचाल करावी, असे मार्गदर्शन प्रसंगी म्हटले. डॉ. एच. ए. तिरपुडे यांनी विज्ञान दिनाच्या निमित्ताने मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या.अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्राचार्य डॉ.मांजरे यांनी विद्यार्थ्यांना विज्ञान दिनाच्या शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास प्रा. डॉ.डी.बी.मुळे, डॉ.ए.एस. टेकाळे, प्रा. एस.एस.पावडे,डॉ.सुहाग पाटील, प्रा.प्रविण रेड्डी,प्रा. प्रसाद महाळंकर तसेच रसायनशास्त्र विभागातील इतर सर्व सहकारी प्रा.ए. टी.नेहरू, कु. दिपमाला बोरोळकर, कु सालेहा उस्ताद, कु.सुप्रिया शेंदकर ,कु अंजुम पठाण व कर्मचारी सुभाष बिरादार, दिलीप बिरादार, गणेश वाघमारे उपस्थित होते.याप्रसंगी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. आयेशा शेख या विद्यार्थिनीने केले तर आभार कु. आदिती पाटील या विद्यार्थीनीने मानले. कार्यक्रमास प्राध्यापक,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!