संत ज्ञानेश्वर माऊली प्राथमिक विद्यालय उदगीर येथे विज्ञान दिन साजरा
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील संत ज्ञानेश्वर माऊली प्राथमिक विद्यालयातील पाचवी ते सातवीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वतः प्रयोग घेऊन आलेला होता. या प्रयोगामधून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये वैज्ञानिक वृत्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष गोविंदराव नीटूरे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रप्रमुख शिवदासे व मुख्याध्यापिका जगताप अनिता व विज्ञान शिक्षिका खुळे उषाकिरण व शाळेतील सर्व शिक्षक बांधव उपस्थित होते.यावेळी प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांनी विद्यार्थ्यांना परिसरातील चहू बाजूंचे निरीक्षण करून, चिकित्सक व वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी विविध गोष्टी सांगितल्या. मुख्याध्यापिका अनिता जगताप यांनी आपण सकाळी उठल्यापासूनरात्री झोपेपर्यंत विज्ञानामुळेच सुखी आहोत, असे सांगितले.या वेळी विज्ञान शिक्षिका खुळे उषाकिरण यांनी सुंदर नियोजन करून प्रत्येक विद्यार्थी सहभागी करून घेतल्याने सर्व पाहुण्यांनी त्याचे कौतुक केले.
