उदगीरात नविन कायदेविषयक कार्यशाळा
उदगीर (एल.पी.उगीले) : पोलिस अधिक्षक कार्यालय लातुर अंतर्गत उदगीर शहर पोलिस स्टेशन व संत तुकाराम विधी महाविद्यालय उदगीर याच्या संयुक्त विद्यमाने नविन कायदेविषयक कार्यशाळा उदगीर शहर पोलिस स्टेशन येथे आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी स.पो.नि. नरसिंह आनलदास,प्रमुख पाहुणे म्हनुण नांदेड जिल्हा सत्र न्यायालयाचे माजी न्यायधीस भाले संभाजी,जिल्हा सरकारी वकील ॲड शिवाजी बिरादार, संत तुकाराम विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.ॲड राजकुमार प्रेमसुख नांवदर , प्रा.ॲड दिप्ती नांवदर,प्रा.ॲड. झेड.के. जागीरदार ,प्रा.ॲड. सुभेदार संतोष, पोलिस उपनिरिक्षक मोहिते पुंडलिक , पोलिस उपनिरीक्षक रवि तारु, अजय कांबळे,प्रा.ॲड. जयवर्धन भाले, प्रा.ॲड.सुरेश मुदुडगे, ॲड. अमोल तलवाडकर,ॲड. रुक्मीणी सोनकांबळे, पो.उपनि. गजानन काळे उपस्थित होते. यावेळी भारतीय नागरी संहिता, भारतीय साक्ष्य अधिनियम ,भारतीय न्याय संहिता अधिनीयम या कायदेविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी शहर पोलिस स्टेशन चे सर्व कर्मचारी व संत तुकाराम विधी महाविद्यालयाचे सर्व विद्याथीॅ, विद्याथीँनी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगेश फुले,गजानन पुल्लेवाड, महेश मुसळे, संजय वाघमारे,विश्वजीत पाटील, प्रनव गायकवाड, लखन डोईजोडे, संभाजी कांबळे, गौतम हाळीखेडे त्यांनी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी संत तुकाराम महाविद्यालयात मुट कोर्ट सादरीकरण अग्रिता विश्वनाथे, किरण पौळ पाटील,यांनी केले. यावेळी त्पाचे मार्गदर्शन झेड. के. जागीरदार यांनी केले. यावेळी सुत्रसंचलन मोहीते,तर आभार गजानन काळे यांनी केले.
