राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त डॉ.राधाकृष्णन प्राथमिक विद्यालयातील बाल वैज्ञानिकांनी केले विज्ञान प्रयोगाचे सादरीकरण
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील डॉ. राधाकृष्णन प्राथमिक विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्याध्यापक ज्ञानोबा कुंडगिरे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रोहित बिराजदार, प्रशांत पांचाळ, विठ्ठल नादरगे, मनोरमा तेलंगे, वर्षा बिरादार यांची उपस्थिती होती. यावेळी 80 विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभागी होऊन प्रयोगाचे सादरीकरण केले. या प्रयोगाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अनेक संकल्पना स्पष्ट होण्यास मदत झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद रावळे यांनी केले ,तर आभार शशिकुमार पाटील यांनी मानले.
