सैनिकी विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

0
सैनिकी विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

उदगीर (एल.पी.उगीले) : श्री छत्रपती शाहू महाराज सैनिकी विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी झालेल्या कार्यक्रमात विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य वसंत कुलकर्णी तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. सीमा मेहत्रे, पर्यवेक्षक अरविंद सोनटक्के, विभाग प्रमुख संतोष चामले, विलास शिंदे, प्रा. नितीन पाटील, एनसीसी प्रमुख बालाजी मुस्कावाड, विनायक करेवाड हे उपस्थित होते.सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात नोबेल पुरस्कार प्राप्त डॉ. सी व्ही रमन यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करुन करण्यात आली.कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या प्रा. सीमा मेहत्रे आपल्या मार्गदर्शनात म्हणाल्या, डॉ. सी व्ही रमन यांनी रमन इफेक्टचा शोध लावला त्यामुळे २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. विज्ञानाने आज प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. विविध शास्त्रज्ञांनी लावलेले शोध यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पर्यवेक्षक अरविंद सोनटक्के आपल्या मार्गदर्शनात म्हणाले, विद्यार्थ्यांनी संशोधन क्षेत्रात कार्य करावे. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विभाग प्रमुख विलास शिंदे म्हणाले, गरज ही शोधाची जननी आहे. विद्यार्थ्यांनी जिज्ञासू वृत्ती जोपासली पाहिजे. भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी जय जवान, जय किसान, जय विज्ञान, ही घोषणा केली.अध्यक्षिय समारोपात प्राचार्य वसंत कुलकर्णी म्हणाले, विद्यार्थ्यांनी डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेची तयारी करावी. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एनसीसी प्रमुख बालाजी मुस्कावाड यांनी केले तर आभार विभाग प्रमुख संतोष चामले यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनील महिंद्रकर, सतीश जगताप, उज्वला वडले, सुधीर गायकवाड, शिवकुमार कोळ्ळे, संजय निरुणे यांनी सहकार्य केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!