महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

0
महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

उदगीर (एल.पी.उगीले) : महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय आणि मराठी विज्ञान परिषद, उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. मस्के होते. प्रमुख पाहुणे धन्वंतरी आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दत्ता पाटील, कै. बापूसाहेब पाटील एकंबेकर महाविद्यालयाच्या गृहविज्ञान विभाग प्रमुख डॉ. रेखा लोणीकर, मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्रा. डॉ. संजय शिंदे, उपप्राचार्य डॉ. एस. जी. पाटील, सचिव प्रा. डॉ. बी. डी. करंडे, प्रा. डॉ. एम. बी. स्वामी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. दत्ता पाटील यांनी तरुणांनी मूलभूत संशोधनाकडे वळावे, असे सांगितले. प्रा. डॉ. संजय शिंदे यांनी मराठी विज्ञान परिषद विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी कार्यरत असल्याचे सांगितले. कार्यक्रमात गणित ज्ञान परीक्षेतील विजेते अदिबा पठाण, मयुरी कांबळे आणि अरुण जाधव यांचा रोख पारितोषिक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. डॉ. रेखा लोणीकर यांनी समतोल आहाराविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. समारोपाच्या भाषणात प्राचार्य डॉ. मस्के यांनी विद्यार्थ्यांनी विज्ञानाच्या अध्ययनातून संशोधन वृत्ती जोपासावी, असे आवाहन केले. उपप्राचार्य डॉ. एस. जी. पाटील यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. आर. बी. अलापुरे यांनी केले, तर प्रा. डॉ. एम. बी. स्वामी यांनी आभार मानले. याप्रसंगी प्रा. डॉ. व्ही. एस. नागपूर्णे, प्रा. डॉ. प्रवीण शेटे, प्रा. प्रवीण जाहुरे, प्रा. पी. पी. वाघमारे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!