पत्रकारांना व बेघर लोकांना घर द्या – बहुजन विकास अभियानाची मागणी
उदगीर (एल.पी.उगीले) : तालुक्यातील सोमनाथपूर येथील सर्वे नंबर 59 मधील 16 एकर शासकीय जमिनीवर उदगीरातील पत्रकारांना व सोमनाथपूर मधील बेघर लोकांना घरे बांधून द्या. अशी मागणी बहुजन विकास अभियानाच्या वतीने जिल्हाधिकारी लातूर यांना करण्यात आली आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकार समाजामध्ये वावरतात, त्यांना देखील राहण्यासाठी घरे लागतात. अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार ,मानसिंग पवार नरसिंग गुरमे ,राजकुमार गाथाडे ,अमोल सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते हबीब पठाण ,मनोज सोनकांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
