सामाजिक बंधुभाव हीच संत साहित्याची शिकवण – आ. संजय बनसोडे
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर ही संताची पावन भुमी आहे. या पावन नगरीत विविध जाती धर्माचे लोक एकोप्याने राहत आहेत. आपल्या पुढच्या पिढीमध्ये वारकरी सांप्रदाया मुळेच चांगले संस्कार येत असुन, संताची शिकवण आपल्या पिढीने जपली पाहिजे. त्यामुळेच सामाजिक बंधुभाव वाढतो. हीच तर खरी संत साहित्याची शिकवण असल्याचे मत माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.ते उदगीर तालुक्यातील नळगीर येथील श्री बापुदेव पांडुरंग मंदिरात आयोजीत अखंड हरिनाम सप्ताह, काल्याचे किर्तन व वाॅटर फिल्टर च्या लोकर्पण सोहळ्यात बोलत होते.यावेळी ह.भ.प. श्रीराम कुटे महाराज हिंगोलीकर, धर्मपाल नादरगे, श्याम डावळे, लक्ष्मण सोनवळे, सत्यवान पांडे, हणमंतराव हंडरगुळे, रावसाहेब पाटील, अरविंद नागरगोजे, दयासागर यल्लावाड, सूर्यकांत नादरगे, बालाजी नादरगे, जयप्रकाश कापसे, सुरेंद्र अक्कनगिरे, तानाजी वडले, रामकिशन नादरगे, सुरेश पेद्दावाड, नितीन होळकर, प्रकाश गुंडरे, सोपान पेद्दावाड, लक्ष्मण उगीले, दिनकर मारमवार, विद्यासागर गट्टेवार, अरविंद जोशी, निवृत्ती भुसाळे, विलास पोतदार, राजकुमार मारमवार, आदी उपस्थित होते.पुढे बोलताना आ.संजय बनसोडे यांनी, वारक-यांच्या प्रश्नासाठी मी मंत्री असताना मंत्रालयात बैठक लावुन त्यांच्या अडचणी समजुन घेवुन वारकरी सांप्रदायाच्या विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली होती. असे सांगुन भविष्यातही मी आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे. आपल्या नळगीर येथील बापुदेवांच मंदिर हे जागृत देवस्थान आहे. येथे भाविकांची भक्ती असुन आपली ईच्छा पूर्ण करणारे हे स्थान असल्याचे भाविक सांगत असतात. मी फक्त एकच मागणे मागत असुन मतदार संघातील जनता सुखी, समाधानी रहावे, हीच प्रार्थना आज करतो. मागील निवडणुकीत माझ्या लाडक्या बहिणीमुळे मतांची लिड वाढली. आता भविष्यात अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, मदतनीस यांच्यासाठी मला काम करायचे आहे. मागील काळात नळगीर गावाच्या विकासासाठी भरपुर निधी दिला असुन भविष्यात ही विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही. लवकरच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता हा लाडक्या बहिणींना मिळणार आहे. आपल्या शेतकरी बांधवांना दिवसा वीज पुरवठा करण्याचा माझा मानस असल्याचे ही आ.संजय बनसोडे यांनी सांगितले.यावेळी नळगीर व पंचक्रोशीतील भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
