किलबिलचा संतोष जाधव याची मुंबई पोलिस म्हणून निवड
किलबिलचा संतोष जाधव याची मुंबई पोलिस म्हणून निवड
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील किलबिल नॅशनल स्कूल शाळेचा विद्यार्थी संतोष लहू जाधव या विद्यार्थ्याची नुकतीच मुंबई पोलीस म्हणून निवड झाली आहे. अतिशय सामान्य कुटुंबातून येऊन आपले स्वतःचे ध्येय निश्चित करून त्या ध्येयाप्रती कठोर मेहनत घेऊन त्याने हे आज यश संपादित केले. त्याने त्याचे आई वडील बरोबर यांचे नाव सार्थ ठरवले. त्याच्या या यशाबद्दल शाळेच्या वतीने त्याचा यथोचित सत्कार करताना संस्थेचे सचिव ज्ञानोबा भोसले, प्राचार्य संतोष पाटील, उपप्राचार्य धर्मसिंग शिराळे सह शाळेतील सर्व स्टाफ यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
