सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅश्नल स्कूल मध्ये मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा
सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅश्नल स्कूल मध्ये मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा
अहमदपूर (गोविंद काळे) : सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅश्नल स्कूल, रुद्धा ता.अहमदपूर येथे काल दि. 27/02/2025 रोजी मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून श्री.गणेश शिक्षण प्रसारक मंडळाच्या अंतर्गत असलेल्या सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅश्नल स्कूल चे संचालक कुलदीप हाके पाटील व संचालिका सौ.शिवालिका कुलदीप हाके पाटील उपस्थित होत्या. कार्यक्रमामध्ये मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले आणि शाळेचे संचालक कुलदीप हाके पाटील यांनी मराठी कवी कुसुमाग्रज यांच्या विषयी मोलाचे विचार मांडले आणि मराठी भाषेचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक हरिदास सर यांनी केले व सूत्रसंचालन कोईलवाड सर यांनी केले तसेच विद्यार्थ्यांनी मराठी कवी कुसुमाग्रज यांच्या विषयी भाषणे सादर केली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले.
