महाबोधी विहार बौध्दांच्या ताब्यात द्यावे यासाठी धरणे आंदोलन
महाबोधी विहार बौध्दांच्या ताब्यात द्यावे यासाठी धरणे आंदोलन
अहमदपूर (गोविंद काळे) : बौध्द गया येथील महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौध्दांच्या ताब्यात द्यावे या प्रमुख मागणीसाठी भंते महाविरो थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली येथील सम्राट मित्रमंडळ-लातूर अहमदपूर व सकल बौध्द समाजाच्या वतीने युवकनेते डॉ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
या प्रसंगी देण्यात आलेल्या निवेदनात पूढे म्हटले आहे की, बौध्दाचे पवित्र स्थळ महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन बिहार येथे चालू आहे.या मागणीला पाठींबा देण्यासाठी संबंध देशभरामध्ये धरणे अंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाच्या समर्थनात अहमदपूर येथे एक दिवसीय धरणे,निदर्शने आंदोलन करण्यात आले.प्रामुख्याने बौद्धगया येथील महाबोधि महाविहार 1949 चा व्यवस्थापन कायद्यामध्ये तात्काळ दुरुस्ती करून महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन हे बौद्धाच्या हाती देण्यात यावे.बुद्धगया महाबोधी महाविहार येथे सुरू असलेल्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनातील सर्व मागण्या त्वरित मंजूर करण्यात याव्यात.जगभरातील सर्व बौद्ध बांधवांच्या भावनेचा विचार करून व आदर करून 1949 च्या व्यवस्थापन कायदा तातडीने दुरुस्त करावा अशा स्वरूपाचे निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी माजी नगरसेवक शेषेराव ससाणे,दयानंद वाघमारे,दूगाने सर,प्राचार्य एम.बी.वाघमारे आदींनी मनोगत व्यक्त केले.
तर भंते महाविरो थेरो यांच्या मनोगतानंतर धरणे आंदोलनाचा समारोप करण्यात आला.
या प्रसंगी माजी नगराध्यक्षा सरस्वतीबाई कांबळे, एम.एन.गायकवाड, शरद कांबळे, अण्णाराव सूर्यवंशी,बालाजी वाघमारे, बजरंग गायकवाड,योगिराज भालेराव,उमाकांत बनसोडे, बी.जी.दिवाणे,लखन गायकवाड,सरपंच राजेश कांबळे,मनोहर पाटील संजय पाटील,सरपंच अशोकराव मोरे,शरद बनसोडे, अॅड.अमितकुमार गायकवाड,पत्रकार भीमराव कांबळे,पत्रकार अजय भालेराव,पत्रकार दयानंद वाघमारे, सचिन बानाटे, आकाश पवार,संविधान उत्तमराव केंद्रे,रितेश रायभोळे,
शिलाताई वाघमारे,उज्ज्वला कांबळे,रमाताई बनसोडे,पूजा सोनकांबळे, अश्वीनी बनसोडे,अनुसया बनसोडे,उषा गायकवाड,राधाबाई बनसोडे आदींसह असंख्य नागरिकांची उपस्थिती होती.
