आईचा खून करणारा व्यसनाधिन विक्रमच्या बायकोनेही घेतली होती फारकत ; आरोपीची जिल्हा कारागृहात रवानगी

0
आईचा खून करणारा व्यसनाधिन विक्रमच्या बायकोनेही घेतली होती फारकत ; आरोपीची जिल्हा कारागृहात रवानगी

आईचा खून करणारा व्यसनाधिन विक्रमच्या बायकोनेही घेतली होती फारकत ; आरोपीची जिल्हा कारागृहात रवानगी

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील महादेवाडी येथील जन्मदात्या आईचा खुन करणाऱ्या व्यसनाधिन विक्रमच्या बायकोनही काही वर्षांपुर्वी फारकत घेतली होती दि २८ फेब्रुवारी रोजी त्याला न्यायालया समोर हजर केले असता न्यायालयाने १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली असुन त्याची आता जिल्हा काराग्रह लातुर येथे रवानगी करण्यात आली आहे.

तालुक्यातील महादेववाडी येथील व्यसनाधिन असलेल्या विक्रम चामे याने वडिलोपार्जित १५ एकर जमिन आपली आई नावावर करून देत नसल्यामुळे गाठ झोपेत असलेल्या आपल्या जन्मदात्या आईचाच (वनिता प्रकाश चामे वय ५५ वर्ष ) धारदार शस्त्राने दि २६ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री खुन करून पुरावे नष्ठ केले होते पोलीसांनी पंचनामा करून खाकीचा रुबाब दाखवताच त्याने आपला गुन्हा कबुल केला होता त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला गेला होता तपास पुर्ण करून आरोपी विक्रम यास दि २८ फेब्रुवारी रोजी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली असुन जिल्हा कारागृहात त्याची रवानगी करण्यात आली आहे.

आरोपी विक्रमचे आता नव नविन कारनामे समोर येत असुन तो सतत दारूच्या नशेत असायचा वडीलांना पण तो सारखा दारू पिऊन त्रास द्यायचा त्याचे मामाच्या पोरीसोबत लग्न झाले होते परंतु तो व्यसनाधिन असल्यामुळे दहा वर्षापुर्वीच बायकोनेही फारकत घेतली होती त्याला एकही संतान नव्हती गेल्या काही वर्षापासुन सातत्याने दारूच्या नशेत आईलाही जमिन नावावर करून दे म्हणुन त्रास देत होता त्यातुनच हे कृत्य घडले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!