शिरूर ताजबंद येथे सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत ग्राम दरबार संपन्न

0
शिरूर ताजबंद येथे सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत ग्राम दरबार संपन्न

शिरूर ताजबंद येथे सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत ग्राम दरबार संपन्न

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील ग्रामपंचायत कार्यालयात जिल्हा परिषद लातूर आणि पंचायत समिती, अहमदपूर व ग्रामपंचायत कार्यालय, शिरूर ताजबंद यांच्या संयुक्त विद्यमाने नाविन्यपूर्ण उपक्रमा अंतर्गत “एक दिवस गावकऱ्यांसोबत…” ह्या महाराष्ट्रातील पहिल्या ग्राम दरबाराचे सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून शुभारंभ करण्यात आला.
यावेळी सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता सुभाष पाटील, गटविकास अधिकारी अमोलकुमार अंदेलवाड, उपअभियंता पाणीपुरवठा धनंजय मुळे, उपविभागीय कृषी अधिकारी श्रेयश यादव, बालविकास प्रकल्प अधिकारी राजेश गजलवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीनिवास मोरे, जि. प. तालुका कृषी अधिकारी यशपाल सातपुते, कृषी मंडळ अधिकारी संदीप आयनुले, वैद्यकीय अधिकारी डॉ. शरद गिरी, प्रवेक्षिका शोभा घोडके, मंडळ अधिकारी अशोक सोनकांबळे, तलाठी गणेश हिंगोले यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
ह्यावेळी विविध शासकीय योजनेची माहिती सांगून मंत्री महोदयांच्या हस्ते मनरेगा अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना जॉब कार्ड, मंजूर सिंचन विहीर, गाय गोटे, महिला व बालविकास विभागाकडून गर्भवती महिलांना बेबी किट व टी. एच. आर.,जि. प.समाज कल्याण सेस फंडातून पात्र लाभार्थ्यांना पिको फॉल मशीन, ब्रास बँड, कृषी विभागाकडून बायोगॅस, कडबा कुटी यंत्र, बचत गटाच्या माध्यमातून महादेव महिला बचत गट चार लक्ष रुपये, जय ललिता महिला बचत गट चार लक्ष रुपये, श्री सरस्वती महिला बचत गट दोन लाख वीस हजाराच्या भारतीय स्टेट बँके कडून पुरविण्यात आलेल्या कर्जाचा धनादेश व घरकुल योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना पंधरा हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक गटविकास अधिकारी अमोलकुमार अंदेलवाड यांनी केले तर सूत्रसंचालन माधव माने व आभार धर्मपाल सरवदे यांनी मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरपंच मच्छिंद्र वाघमारे, उपसरपंच सुरज भैय्या पाटील, ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत घुगे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य/ सदस्या कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी, अंगणवाडी कार्यकर्ती, मदतनीस, आशा वर्कर, बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!