अहमदपूर येथील सावरकर स्मारकाचे होणार सुशोभीकरण.- महाराष्ट्राचे सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांचे प्रतिपादन
अहमदपूर येथील सावरकर स्मारकाचे होणार सुशोभीकरण.- महाराष्ट्राचे सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांचे प्रतिपादन
अहमदपूर (गोविंद काळे) : शहरातील रेणुका भवन येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या ५९व्या पुण्यतिथीनिमित्त ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ भूषणकुमार जोरगुलवार यांचे व्याख्यान आज आयोजित करण्यात आले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर देशप्रेमासाठीच जन्मले होते. त्यांनी आपला संपूर्ण जन्म या देशासाठी वाहिला. जीवन जगत असताना मृत्यू सतत त्यांचा पाठलाग करत होता. देशकार्यासोबतच सामाजिक सुधारणा आणि साहित्याच्या क्षेत्रात सावरकरांनी भरपूर योगदान दिले. या देशावर प्रेम करणारा तो हिंदु अशी सावरकरांची हिंदुत्वाची व्याख्या होती असे प्रतिपादन प्रा.जोरगुलवार यांनी केले. याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री नामदार श्री. बाबासाहेब पाटील यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अंदमानात सोसलेल्या हाल अपेष्टांचे वर्णन केले. शहरातील सावरकर चौकाचे लवकरच सुशोभीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा केली. तसेच लोकसहभागातून सावरकरांच्या अर्धाकृती पुतळ्याचे जागी पूर्णाकृती पुतळा लवकरच बसवला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी रेणुका भवन व सावरकरसमितीच्या वतीने माननीय मंत्रीमहोदय, प्रमुख वक्ते व इतर मान्यवरांचा शाल, पुष्पहार व सावरकरांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री.दिलीपरावजी देशमुख, माजी नगराध्यक्ष भारतभाऊ चामे, माजी सभापती अशोककाका केंद्रे, राष्ट्रवादीचे सरचिटणीस शिवानंद हेंगणे, ॲड. भारतभूषण क्षीरसागर, ॲड. भगवानराव पौळ, योगाचार्य शिवमूर्ती व सौ. कलावती भातांब्रे , साहित्यिक मोहिब कादरी, पत्रकार शिवाजीरिव गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी सौ. मुग्धा व श्री. गोपीनाथ मांडणीकर तसेच सौ. अंजली कुलकर्णी यांनी देशभक्तीपर गीते सादर केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. धनंजय किशनराव जोशी हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ सिद्धार्थकुमार सूर्यवंशी, विहिप मंत्री श्री. मधुकर धडे, शिवसेना शहराध्यक्ष श्री.लक्ष्मण अलगुले, भाजप तालुकाध्यक्ष प्रतापराव पाटील, माजी नगराध्यक्ष ॲड सिद्धेश्वर कासनाळे, श्री. शरद जोशी, श्री.दिलीप शास्त्री, डॉ.मधुसूदन चेरेकर, ॲड सुहास पाटील, अनिकेत काशीकर, डॉ सुहास जोशी, अशोक गायकवाड, संतोष सोलपूरे, गुरुनाथ सोलपुरे यांनी विशेष परिश्रम घेतले. ॲड सुहास पाटील यांनी आभार मानले.वंदे मातरम या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
