सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅश्नल स्कूल मध्ये विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅश्नल स्कूल मध्ये विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
अहमदपूर (गोविंद काळे) : सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅश्नल स्कूल, रुद्धा ता.अहमदपूर येथे काल दि. 28/02/2025 रोजी विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून श्री.गणेश शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव रेखाताई तरडे मॅडम उपस्थित होत्या आणि प्रमुख पाहुणे म्हणून सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅश्नल स्कूल चे संचालक कुलदीप हाके पाटील व संचालिका सौ.शिवालिका कुलदीप हाके पाटील उपस्थित होत्या. विज्ञानातील शास्त्रज्ञ चंद्रशेखर व्यंकट रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करून संचालक कुलदीप हाके पाटील यांनी त्यांच्या विषयी मोलाचे विचार मांडले आणि विज्ञान दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक हरिदास सर यांनी केले व सूत्रसंचालन कोईलवाड सर यांनी केले तसेच विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक शास्त्रज्ञ यांच्या विषयी भाषणे सादर केली.तथा विज्ञानाशी संबंधित प्रयोगांचे सादरीकरण भित्तीपत्रके व भित्तीचित्रे यांचेही सादरीकरण केले. याकार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले.
