पोस्ते पोदार स्कूल येथे रंगकर्मीच्या स्पर्धेचे पारितोषिक वितरण

0
पोस्ते पोदार स्कूल येथे रंगकर्मीच्या स्पर्धेचे पारितोषिक वितरण

पोस्ते पोदार स्कूल येथे रंगकर्मीच्या स्पर्धेचे पारितोषिक वितरण

उदगीर (एल.पी.उगीले) : पोस्ते पोद्दार लर्न स्कूल येथे रंगकर्मी प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय चित्रकला, रंगभरण व निबंध लेखन स्पर्धेत घवघवीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. यावेळी संचालक धर्मपाल देवशेट्टे , शाळेचे सचिव सुरज पोस्ते, अध्यक्ष प्रियंकाताई पोस्ते, जगदेवी पोस्ते, प्राचार्य दिंगंबर शेकापूरे ,उपप्राचार्य मुबारक शेख ,शाळेचे समन्वयक
श्रीकृष्ण तत्तापुरे, मंजुषा पाटील, दीपा आंबेसंगे, मीनाक्षी बिरादार, स्विना खैरा, निलेश बेंद्रे, पंकज पाटील, व मार्गदर्शक कलाशिक्षक: पटेल जहांगीर, अनिस शेख, अनिल वाघोवसे, सोनाली गजानन माने, शाळेतील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते
स्पर्धेतील प्रथम क्रमांक मिळविलेले विद्यार्थी स्वरा सुरज पोस्ते,श्रावणी दयानंद देवने,गिरीजा जयवंत क्षीरसागर, पूर्वी विलास बच्चेवार या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक यांच्यासह द्बितीय ,तृतीय व उत्तेजनार्थ पारितोषिके पटकाविल्याबद्ल विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!