सरदार वल्लभभाई पटेल विद्यालयाचा रौप्य महोत्सव उत्साहात संपन्न
सरदार वल्लभभाई पटेल विद्यालयाचा रौप्य महोत्सव उत्साहात संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : राष्ट्रीय ज्ञान विकास मंडळ द्वारा संचलित सरदार वल्लभभाई पटेल प्राथमिक विद्यालय उदगीर येथे रोपे महोत्सवाचा सांगता समारंभ मोठ्या उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप गायकवाड, तर प्रमुख पाहुणे आ.
अतुलजी भातखळकर व प्रमुख उपस्थित सौ रश्मी अतुल भातखळकर मुंबई तसेच संस्थेचे पदाधिकारी अध्यक्ष भगवानराव वट्टमवार, उपाध्यक्ष अपर्णा पटवारी, कार्यवाह डॉ. अंबादासराव देशमुख ,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उमाकांत बुधे, विनोद पेंढारकर, मुख्याध्यापिका मंजुषा कुलकर्णी, सेमी विभाग प्रमुख आशा बेंजरगे व उद्योजिका महिला व सर्व शिक्षक वृंद, पालक उपस्थित होते. शाळेच्या प्रवेशद्वारावर औक्षण करून, मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. विद्येची देवता सरस्वती यांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून, व्यासपीठावर विराजमान झाले. मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य याचा सादरीकरण मान्यवरांच्या पुढे केल तसेच सेमी विभागातील विद्यार्थ्यांनी लेझीम,झेंडा, डंबेल्स , घुंगरू काठी प्रात्यक्षिक दाखवले. सौ. रश्मीताई भातकळकर यांच्या हस्ते इयत्ता पहिली सेमी विभागातील डिजिटल वर्गाचे उद्घाटन करण्यात आले, आणि सर्व मान्यवरांनी विज्ञान प्रयोग कक्ष, पाहणी व ग्रंथालय कक्ष व संगणक कक्ष तसेच शाळा पाहणी केली. मान्यवरांच्या हस्ते कुसुमाग्रज व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. स्वागत नृत्य सेमी इंग्रजी विभागातील चौथी वर्गातील विद्यार्थिनी कुमारी ज्ञानदा बिरादार हिने सादर केले. प्रमुख पाहुणे आ. अतुलजी भातखळकर यांचा सत्कार संस्थेचे कार्यवाह डॉ. अंबादासराव देशमुख यांनी सत्कार केला. प्रमुख उपस्थित लाभलेल्या सौ. रश्मीताई अतुलजी भातखळकर यांचा सत्कार संस्थेच्या उपाध्यक्ष अपर्णाताई पटवारी यांनी केला. मराठी भाषा दिनानिमित्त स्वरचित गीत प्रशालेच्या शिक्षिका सौ. पल्लवी निडवदे यांनी गायले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका मंजुषाताई कुलकर्णी यांनी मान्यवरांचा परिचय करून दिले. विद्यार्थ्यांनी विविध कला गुणदर्शन करून दाखवले.
