उदगीरात तीव्र निदर्शने महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनास जाहीर पाठिंबा

0
उदगीरात तीव्र निदर्शने महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनास जाहीर पाठिंबा

उदगीरात तीव्र निदर्शने महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनास जाहीर पाठिंबा

उदगीर (एल.पी.उगीले) : शहरामध्ये लष्कर ए भीमा युवा संघटनेच्या वतीने एक मार्च रोजी तीव्र निदर्शने करण्यात आली. बुद्धगयातील महाबोधी महाविहार 1949 चा व्यवस्थापन ॲक्ट मध्ये तात्काळ दुरुस्ती करावी, या ॲक्टमुळे बुद्धगया येथील महाबोधी महाविहार व्यवस्थापनामध्ये इतर धर्मियांची संख्या जास्त असल्यामुळे, महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन योग्यरीत्या होत नसल्याने, जगभरातील बुद्ध अनुयायांमध्ये असंतोषाचे वातावरण असल्यामुळे, महाबोधि महाविहाराचे व्यवस्थापन हे संपूर्ण बौद्ध धर्मीयांच्या हाती देण्यात यावे, व बुद्धगया महाबोधी महाविहार येथे सुरू असलेल्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनातील सर्व मागण्या त्वरित मंजूर करण्यात याव्यात, जगभरातील व विदेशातील सर्व बौद्ध बांधवांच्या भावनेचा विचार व आदर करून 1949 चा व्यवस्थापन ॲक्ट दुरुस्त करावा, व तात्काळ बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्त करण्यात यावे, ही मागणी लष्कर ए भीमा संघटनेच्या वतीने राष्ट्रपती यांना निवेदनाद्वारे सादर केली आहे. तात्काळ मागण्या मान्य करा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे नेते दिलीपजी कांबळे, ज्येष्ठ नेते बापूसाहेब कांबळे, उत्तम भारती, दिलीप कांबळे कुसनूरकर, नितीन एकुरकेकर, लष्कर ए भीमा संघटनेचे तालुकाध्यक्ष सुशील मादळे, शहराध्यक्ष आशिष कोकणे, विकी गायकवाड, अमोल सोनवणे, सागर पिंजरे, आकाश माने, श्रावण श्रीमंगले इत्यादी बौद्ध बांधव मोठ्या संख्येने होते. यावेळी शांततेत घोषणाबाजी करून, आपल्या मागण्या मांडून प्रशासनास निवेदन देण्यात आले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!