विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक घडविण्यासाठी विज्ञान प्रदर्शनाची गरज – आ. अतुलजी भातखळकर

0
विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक घडविण्यासाठी विज्ञान प्रदर्शनाची गरज - आ. अतुलजी भातखळकर

विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक घडविण्यासाठी विज्ञान प्रदर्शनाची गरज - आ. अतुलजी भातखळकर

उदगीर (एल.पी.उगीले) : राष्ट्रीय ज्ञान विकास मंडळ उदगीर द्वारा संचलित सरदार वल्लभभाई पटेल सेमी इंग्रजी विभागातर्फे आयोजित विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिलीप गायकवाड तर प्रमुख अतिथी म्हणून आ.अतुलजी भातखळकर, माजी आ. गोविंदजी केंद्रे, संस्थेचे अध्यक्ष भगवानराव वट्टमवार, संस्थेच्या उपाध्यक्षा सौं. अपर्णाताई पटवारी, संस्थेचे कार्यवाह डॉक्टर अंबादासराव देशमुख, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उमाकांत राव बुधे, संस्थेच्या सर्व मान्यवर पदाधिकारी मुख्याध्यापिका मंजुषाताई कुलकर्णी, सेमी इंग्रजी विभाग प्रमुख सौं आशा बेंजरगे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विज्ञान प्रयोगाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच विज्ञान प्रदर्शनाचे पूर्ण परीक्षण मान्यवरांनी केले. विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रयोगात आपल्या कल्पकतेनुसार इलेक्ट्रिक ट्रॅक, सोलर पॅनल, सोलर सिस्टिम, जलमार्ग, वॉटर प्युरिफायर असे विविध प्रयोगाचे सादरीकरण केले. विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातूनच विद्यार्थी वैज्ञानिक घडतील, विद्यार्थ्यांच्या जिज्ञासूवृत्तीला विज्ञान प्रदर्शनातून प्रोत्साहन मिळेल. असे प्रतिपादन आ. अतुल भातखळकर यांनी केले. दिलीप गायकवाड यांनी विज्ञान प्रयोगातील सर्व विद्यार्थ्यांना विज्ञान दिनाच्या शुभेच्छा देऊन सखोल मार्गदर्शन केले. सेमी इंग्रजी विभाग प्रमुख सौ आशा बेंजरगे , विज्ञान प्रमुख सौ भक्ती कुलकर्णी सौ.भाग्यश्री शिरोळे यांच्या हस्ते विज्ञान प्रयोगातील प्रथम, द्वितीय, तृतीय तसेच सहभागी सर्व विद्यार्थ्यांना विज्ञान प्रदर्शनाचे बक्षीस वितरण करण्यात आले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!