वर्षां बामणे यांना ढोरसांगवी शाळेच्या वतीने निरोप
वर्षां बामणे यांना ढोरसांगवी शाळेच्या वतीने निरोप
उदगीर (एल.पी.उगीले) : माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी त्यांच्या काळात सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुखमंत्री युवा प्रशिक्षणार्थी या योजनेअंतर्गत ज्या शाळेत वर्ग व विद्यार्थी संख्या जास्त आहे पण शिक्षकांची संख्या कमी आहे, अशा शाळेत डी.एड., बी.एड. धारकांना शाळा सहाय्यक म्हणून सहा महिन्यासाठी नेमणूक केली होती. अशीच नेमणूक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोरसांगवी शाळेत गावातील श्रीमती वर्षा बबन पोतने( बामणे) यांची नियक्ती झाली होती. त्यांना सहा महिने पूर्ण झाल्यामुळे आदेशाप्रमाणे त्यांना शाळेच्या वतीने सत्कार पूर्ण निरोप देण्यात आला,अनेक मुलामुलींनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. तसेच सुवर्णा नलाबले यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले. जी.टी.मुंडे यांनी सूत्रसंचालन व मनोगत व्यक्त केले. सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी जड अंतःकरणाने वर्षाताई यांना निरोप देण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक ज्ञानोबा टेकले,गंगाधर मुंडे, सुवर्णमाला नलाबले आदी उपस्थित होते.
