मातोश्री रमाबाई आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात मराठी भाषा गौरव दिन
मातोश्री रमाबाई आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात मराठी भाषा गौरव दिन
उदगीर (एल.पी.उगीले) : मातोश्री रमाबाई आंबेडकर सार्वजनिक वाचनालय उदगीर येथे मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. यावेळी पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे प्रा. डॉ. भोसले यांच्या हस्ते वि.वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या जयंती निमित्त शासन प्रपत्रानुसार मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव डॉ. मनोज गायकवाड, कोषाध्यक्ष प्रदीप गायकवाड, ग्रंथपाल सिद्धार्थ गायकवाड, अमित प्रभूराव गायकवाड व वाचक उपस्थित होते.
