आ. अमित भैय्या देशमुख यांच्या निवडीने काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण होणार – प्रीती चंद्रशेखर भोसले
आ. अमित भैय्या देशमुख यांच्या निवडीने काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण होणार - प्रीती चंद्रशेखर भोसले
उदगीर (एल.पी.उगीले) : महाराष्ट्र राज्यामध्ये काँग्रेस पक्षाची पुनर्बांधणी करण्यासाठी आणि पक्षाची प्रतिमा उंचावण्यासाठी मोठ्या प्रमाणात खांदेपालट करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांची निवड झाल्यानंतर, काँग्रेस पक्षाचा प्रभावी चेहरा म्हणून युवा नेते माजी मंत्री आ. अमित भैय्या विलासरावजी देशमुख यांची नियुक्ती काँग्रेसच्या मुख्य प्रतोदपदी करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे आणि भूमिका अत्यंत प्रभावीपणे मांडण्याची क्षमता आणि शैली अमित भैया देशमुख यांच्याकडे असल्यामुळे ही निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे लातूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षामध्ये नवचैतन्य निर्माण होईल. अशी अपेक्षा उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती प्रीती चंद्रशेखर भोसले यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली आहे.
काँग्रेस पक्षाने विधिमंडळ पक्ष पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या मंजुरीनंतर काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणू गोपाल यांनी केल्या आहेत. यामध्ये अग्रक्रमाने माजी मंत्री अमित विलासराव देशमुख, सतेज पाटील, अमीन पटेल, विश्वजीत कदम, शिरीष कुमार नाईक संजय मेश्राम इत्यादी नेत्याकडे महत्वपूर्ण जबाबदाऱ्या सोपवलेल्या आहे. विधिमंडळात काँग्रेस पक्षाचे आमदारांची संख्या कमी असली तरी मोठ्या उत्साहाने आणि जोमाने सर्वसामान्यांचे प्रश्न मांडणे आणि पक्ष संघटनेची पुनर्बांधणी तेवढ्याच ताकतीने करणे गरजेचे आहे. लोकांचा विश्वास आत्मसात करण्यासाठी आणि काँग्रेसच्या भूमिका जनसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी माजी मंत्री आ. अमित भैया देशमुख प्रभावीपणे काम करतील. अशी अपेक्षा पक्षश्रेष्ठींना वाटत आहे. ते योग्य असून अमित भैय्या देशमुख यांनी पक्ष संघटन वाढीसाठी केलेले मोठे कार्य निश्चितच जनतेसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे. असेही विचार प्रीती चंद्रशेखर भोसले यांनी याप्रसंगी व्यक्त केले आहेत.
