शिक्षणाच्या पंढरीतच शिक्षणाचा सावळा गोंधळ ; विमलाबाई देशमुख परीक्षा केंद्रावरील प्रकार

0
शिक्षणाच्या पंढरीतच शिक्षणाचा सावळा गोंधळ ; विमलाबाई देशमुख परीक्षा केंद्रावरील प्रकार

शिक्षणाच्या पंढरीतच शिक्षणाचा सावळा गोंधळ ; विमलाबाई देशमुख परीक्षा केंद्रावरील प्रकार

शिक्षण विभागाच्या सावळ्या गोंधळामुळे २१ विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात

उर्दू माध्यमच्या २१ विद्यार्थ्यांना प्रथम भाषा इंग्रजी (०३) ची प्रश्नपत्रिका… तीन तास परीक्षार्थी परीक्षा दालन मध्येच!

अहमदपूर (गोविंद काळे) : शहरातील विमलाबाई देशमुख प्रशाला (४०६४) या शाळेत इयत्ता दहावीचे परीक्षा केंद्र असून शनिवार दि. १ मार्च रोजी इंग्रजी विषयाचा पेपर होता. याच केंद्रावर उर्दू माध्यमच्या २१ विद्यार्थ्यांना इंग्रजी (१७) या विषयाची कृतीपत्रिका देण्याऐवजी प्रथम भाषा इंग्रजी (०३) ची प्रश्नपत्रिका देण्यात आली. एवढेच नसून परीक्षार्थ्यांनी हा आमचा पेपर नाही म्हणून सांगितल्यावर सुद्धा त्यांना तीन तास ताटकळत बसवून ठेवल्याची घटना घडली आहे.
सदर परीक्षा केंद्रावरील परीक्षा दालन मध्ये पर्यवेक्षकांनी प्रश्नपत्रिका वाटप केल्यानंतर परीक्षार्थ्यांनी या प्रश्नपत्रिकेवर आक्षेप घेत हा आमच्या विषयाचा पेपर नाही असे सांगून सुध्दा पर्यवेक्षकांनी हीच तुमची कृतीपत्रिका आहे असे म्हणून तीन तास उर्दू माध्यमच्या २१ विद्यार्थ्यांना इंग्रजी १७ विषयाच्या तृतीय भाषेचा पेपर ऐवजी प्रथम भाषा इंग्रजीतील (३) ची कृतीपत्रिका लिहिण्यास भाग पाडले. त्यामुळे परीक्षार्थी संभ्रमात पडले. सदर चूक केंद्राच्या निदर्शनास आणून सुद्धा केंद्राच्या गंभीर चूक व ढिसाळपणामुळे परीक्षार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. परिणामी परीक्षार्थी चिंताग्रस्त झाले आहेत.
सदर केंद्रावर उर्दू माध्यमचे शादुल्ला अहमद पठाण, फातेमा आयुब पठाण, नाजीया पिरखाॅ पठाण, जुबेर इब्राहिम पठाण, उमेद इरफान पठाण, मोहनुर तनवीर पठाण, तमन्ना मन्सूर पठाण, उम्मेफलक आजम पठाण, जुनेद फिरोजखाॅ पठाण, तणजीला अकबरखाॅ पठाण, सदफ अहमद पठाण, अ. बारो गफार पठाण, नगमा अकबर पठाण, लईबा इरफानखाॅ पठाण, वाजीद दिलदार पठाण, तनवीर फेरोज पठाण, वसीम दिलदार पठाण, महेक बशीर पठाण, सालेहा सैलानी पठाण, अनम खब्बाद पटेल, नर्गीस खय्युम पठाण या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
सदर परीक्षा केंद्रावर योग्य ती कार्यवाही करून परीक्षार्थांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी मागणी एस.ए. जागीरदार माध्यमिक विद्यालय काळेगाव, मौलाना आझाद हायस्कूल अहमदपूर, सिराज उल उलूम गर्ल्स हायस्कूल अहमदपूर, उस्मानिया उर्दू हायस्कूल अहमदपूर या शाळेच्या मुख्याध्यापकांनी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती अहमदपूर यांच्याकडे केली आहे.

या संदर्भात केंद्र प्रमुख एस.ए कोयले यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता त्यांनी सांगीतले की, स्टिकरच्या कलर वरून आणि लिपिक नविन असल्यामुळे अनावधानाने चुकीने पेपर वाटप करण्यात आले याविषयी मी बोर्डाकडे प्राथमिक माहीती कळवली असुन पत्र व्यवहार करणार असल्याची प्रतिक्रिया दिली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!