साहित्यीक शंकर बोईनवाड यांचा आदर्श शिक्षक समिती च्या वतीने सत्कार
साहित्यीक शंकर बोईनवाड यांचा आदर्श शिक्षक समिती च्या वतीने सत्कार
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर येथे लोकसंस्कृती साहित्य संमेलन 2025 संमेलनात प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांच्या हस्ते साहित्यीक, कथाकार, संपादक व उत्कृष्ट पत्रकार शंकर बोईनवाड यांचा “आदर्श नगरीचा राजू” किशोर कांदबरीचे प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या निमित्ताने आदर्श शिक्षक समिती च्या वतीने कांदबरीकार शंकर बोईनवाड यांचे मनःपूर्वक अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. व शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी आदर्श शिक्षक समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर बडगे, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख प्रदीप तळेगांवकर, उदगीर तालुका अध्यक्ष पुंडलिक मुळे, उदगीर कार्याध्यक्ष रमेश खंडोमलके व शांतकुमार बिरादार आदी मित्र परिवार उपस्थित होते.
