फिट इंडियातंर्गत शास्त्री विद्यालयाचा संडे ऑन सायकल उपक्रम
फिट इंडियातंर्गत शास्त्री विद्यालयाचा संडे ऑन सायकल उपक्रम
उदगीर (एल.पी.उगीले) : फिट इंडियातंर्गत लालबहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयाच्यावतीने संडे ऑन सायकल या उपक्रमाचं आयोजन करण्यात आले.
या उपक्रमात विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. सायकलींगची सुरुवात उपमुख्याध्यापक अरुण पत्की यांनी सर्व सायकल धारकांना हिरवा झेंडा दाखवून केला. या उपक्रमामध्ये विद्यालयातील एकूण 95 मुले सहभागी झालेली होती. या उपक्रमासाठी क्रीडा शिक्षक संतोष कोले, एन.सी.सी.विभागप्रमुख विष्णू तेलंग, कलाशिक्षक गुरुदत्त महामुनी, अटल टिंकरिंग लॅब प्रमुख पंकज देशमुख यांनी परिश्रम घेतले.
सायकल रॅलीची सुरुवात विद्यालय ते कॅप्टन चौक,नाईक चौक, आप्पाराव चौक, आय.टी.आय कॉलेज पर्यंत आणि तेथून पुन्हा विद्यालयात येऊन समारोप विद्यालयाच्या प्रांगणात झाला.दर रविवारी हा उपक्रम घेण्याचा मनोदय सायकल धारकांनी केला.
