महाराष्ट्र उदयगिरीच्या विद्यार्थ्यांची फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स, चाकण येथे निवड
महाराष्ट्र उदयगिरीच्या विद्यार्थ्यांची फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स, चाकण येथे निवड
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील एचएसव्हीसी विभागातील इयत्ता १२ वी इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांची प्रतिष्ठित फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स, चाकण (एमआयडीसी, पुणे) येथे प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. यामध्ये गणेश बनसोडे, रुपेश पांडे, सोहेल इकबाल शेख, अथर्व सोनकांबळे, अनिकेत वाहुळे, गोविंद सूर्यवंशी, प्रशांत सूर्यवंशी, गणेश जलंगे, शिवशंकर कुंभार आणि रेखा केदासे यांचा समावेश आहे. फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स ही भारतातील नावाजलेली कंपनी असून ती विमान, रेल्वे, चारचाकी, दुचाकी तसेच विविध वाहनांसाठी इंडिकेटर आणि अन्य अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणे तयार करते. विद्यार्थ्यांना अशा नामांकित कंपनीत प्रशिक्षणाची संधी मिळाल्याने महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या यशाबद्दल सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी, उपाध्यक्ष डॉ.रेखा रेड्डी, सचिव रामचंद्र तिरुके, सहसचिव अॅड.एस.टी.पाटील चिघळीकर आणि डॉ.रामप्रसाद लखोटिया, कोषाध्यक्ष भालचंद्र चाकूरकर तसेच सर्व संस्था सदस्य, प्राचार्य डॉ.आर.के.मस्के, उपप्राचार्य डॉ.एस.जी.पाटील, एचएसव्हीसी विभागाचे प्रमुख प्रा. जी.एस. पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले असून त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
