आपला लोकसेवक म्हणूनच काम केले, पुढेही करेन : आ. संजय बनसोडे

0
आपला लोकसेवक म्हणूनच काम केले, पुढेही करेन : आ. संजय बनसोडे

आपला लोकसेवक म्हणूनच काम केले, पुढेही करेन : आ. संजय बनसोडे

उदगीर (एल.पी.उगीले) : जनसेवेसाठी आमदारकी आणि मंत्री पदाचा कधीही गर्व केला नाही. सन २०१४ पासून मतदार संघातील जनतेच्या सेवेत अविरतपणे कामे केली. त्यामुळेच मागील २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत मला पहिल्यांदा आमदार होण्याची संधी आपण सर्वांनी दिली. व आपल्या मताचा आदर करुन पक्षश्रेष्ठींनी मंत्री पदाची जबाबदारी दिल्याने मागील पाच वर्षाच्या कार्यकाळात सहा हजार कोटींपेक्षा जास्त विकास निधी खेचुन आणला. आपल्या भागाचा विकास केला, आणि हे सर्व करत असताना आपला लोकसेवक म्हणून काम केले, असे विचार माजी क्रीडा मंत्री, आ. संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
उदगीर तालुक्यातील हेर ग्रामस्थांच्या वतीने आयोजीत भव्य नागरी सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी माजी आ.गोविंद केंद्रे, रामचंद्र तिरुके, बाबासाहेब पाटील, भागवत गुरमे, बालाजी भोसले, वसंत पाटील, रजनीत रासुरे,हणमंतराव हंडरगुळे, लक्ष्मण जाधव, लक्ष्मण गुराळे, बालाजी पुरी, अनंत पाटील, धनाजी माटेकर, गणपती मुंडे, सुदर्शन मुंडे, मारोतीराव घोणसे, विलास कांबळे, मारोतीराव घोणसे, सुधाकर बिरादार, केशव कांबळे, भगवंत मिटकरी, दत्ता बुरले, गंगाधर स्वामी, गुरपत अप्पा मळभागे, रवी रासुरे, सोयराबाई कांबळे, माधव मिटकरी, तानाजी मुंडे, आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.संजय बनसोडे यांनी, मागच्या काळात केलेल्या विकास निधीमुळेच मतदार संघाच्या चेहरा मोहरा बदलण्याचे काम केल्याने २०२४ च्या निवडणुकीत आपण सर्वांनी ९३ हजाराचे मताधिक्य देवून मला दुस-यांदा आमदार केले. आता आणखीन काम करण्याची जबाबदारी वाढली असुन मी कधीही आमदारकी आणि मंत्री पदाचा गर्व केला नाही. जनतेचा जनसेवक समजुन जनतेच्या सेवेत सदैव उपलब्ध आहे. मी माझ्या ३२ वर्षाच्या राजकीय व सामाजिक जीवनात काम करत असताना मी चळवळीतुन घडलेला कार्यकर्ता असल्याने मला सर्वसामान्यांचे दु:ख समजते.
उदगीर जिल्हा निर्मितीसाठी मी प्रयत्नशील असुन त्यासाठी आपण सर्व शासकीय इमारतीसह उपप्रादेशिक परिवहन कार्यालय उदगीरला मंजूर करुन ते कार्यान्वित केले. आता एम.एच. ५५ ही उदगीरकरांची महाराष्ट्रात नवी ओळख दिली आहे, असेही सांगितले.
यावेळी हेर गावातील नागरीक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!