कस्तुराबाई व मातृभूमी नर्सिंग स्कूलमधून दर्जेदार प्रशिक्षण – डाॅ.रवींद्र पाटील

0
कस्तुराबाई व मातृभूमी नर्सिंग स्कूलमधून दर्जेदार प्रशिक्षण - डाॅ.रवींद्र पाटील

कस्तुराबाई व मातृभूमी नर्सिंग स्कूलमधून दर्जेदार प्रशिक्षण - डाॅ.रवींद्र पाटील

उदगीर (एल.पी.उगीले) : कस्तुराबाई नर्सिंग स्कूल व मातृभूमी नर्सिंग स्कूल मधून नर्सिंगचे दर्जेदार प्रशिक्षणातून उत्कृष्ट विद्यार्थी घडवले जात आहेत. असे प्रतिपादन डॉ. रवींद्र पाटील यांनी केले. ते मातृभूमी व कस्तुराबाई नर्सिंग स्कूलच्या वतीने आयोजित मॉडेल बनविणे व सादरीकरण कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी मातृभूमी प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश उस्तुरे, मातृभूमी महाविद्यालयाच्या प्राचार्या उषा कुलकर्णी यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ. पाटील म्हणाले की, अभ्यासातील मूळ संकल्पना समजण्यासाठी व विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी मॉडेल्स बनवणे व त्याचे सादरीकरण करणे हा उपक्रम महत्त्वाचा असून विद्यार्थ्यांनी बनवलेल्या मॉडेलचे व सादरिकरणाचे डॉ पाटील यांनी कौतुक केले. यावेळी मॉडेल्स बनवणे व सादरीकरण करण्याच्या स्पर्धेतील विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी हृदय, मानवी शरीरातील हाडे, यकृत दात, जीभ, पचनक्रिया आदींच्या प्रतिकृती बनवत सादरीकरण केले होते.या वेळी सतिश उस्तुरे ,सुरेश पाटील ,धनंजय गुडसुरकर, सचीन शिवशेट्टे यांच्या हस्ते उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल विद्यार्थ्यांना पारीतोषिके देण्यात आली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!