सत्य आणि सौंदर्य या मूल्यांची जोपासना अशा संमेलनातून व्हावी – डॉ.खंदारे

0
सत्य आणि सौंदर्य या मूल्यांची जोपासना अशा संमेलनातून व्हावी - डॉ.खंदारे

सत्य आणि सौंदर्य या मूल्यांची जोपासना अशा संमेलनातून व्हावी - डॉ.खंदारे

उदगीर (एल.पी.उगीले) : सत्य आणि सौंदर्य या मूल्याची जोपासना साहित्य संमेलना मधून व्हावी, व मानवाचे जीवन फुलवणार
मूल्य साहित्य संमेलनातून यावेत. असे प्रतिपादन पहिल्या गावगाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून बोलताना लोक साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. साहेब खंदारे यांनी तादलापूर येथील गावगाडा साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.
माय मराठी, अरुणा प्रकाशन आणि निसर्ग मंडळ आयोजित कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नागरी, तादलापूर येथे पहिले गावगाडा राज्यस्तरीय एकदिवसीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमाला संमेलनाध्यक्ष गांधीवादी विचारवंत प्रा. मॅक्सवेल लोपीज, उद्घाटक म्हणून लोकसाहित्य व लोकसंस्कृतीचे अभ्यासक प्रा.साहेब खंदारे, स्वागताध्यक्ष उद्योजक जयवंतराव पाटील,डॉ अंजुम कादरी , सामाजिक न्याय विभागाचे उपायुक्त रघुनाथ देवशटवार व राजेश बिराजदार, मसापचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांची उपस्थिती होती.यावेळी कर्नाटकातून सुरुवात झालेली ग्रंथदीडी महाराष्ट्रात आली, हे या गावगाडा साहित्य संमेलनाचे वैशिष्टय असून अमुर्त सांस्कृतितून शाश्वत विकास केंद्रस्थानी असलेल्या वाड्याच्या भोवती लोकसंस्कृती बहरली. याच वाड्यात भरतमुनीचे नाट्यशास्त्र निर्माण झाले. ओवी ही मराठी कवितेची जननी असून
सावळ्या ग मुखावर
मुरमानं केलं घर
मुरमानं केलं घर
माझे नेनती घाल
जानीला आवर
अशा प्रकारे वयात आलेल्या लेकीला नीतीच शिक्षण आई देते.
राम नाही ओ गुणाचा
अशी गवागड्यातील राम सीतेची व्यक्तिरेखा चितारते.
परंतु आज मराठी साहित्याची परिस्थिती पाहता मराठी साहित्यान लोकसंस्कृतीशी नाळ तोडली त्यामुळे प्रचंड मोठे संकट उभे राहिले आहे. असे प्रतिपादन केले.निसर्गापासून झालेली फारकत दूर करावी लागेल असे संमेलनाचे अध्यक्ष प्रा. मॅक्सवेल लोपीस यांनी सांगितले.
‘हरवलेला माणूस जगवायचा आजचे आव्हान आहे, यासाठी पूर्वीच्या चांगल्या गोष्टी आपल्याला पुन्हा अमलात आणाव्या लागतील. निसर्गापासून माणसाची झालेली फारकत व स्वतःपासून झालेली फारकत या दोन बाबी लक्षात घेऊन आता शब्दांचे शस्त्र हाती घेऊन भवताल घडवावा लागेल’ असे प्रतिपादन गांधीवादी विचारवंत प्रा. मॅक्सवेल लोपीस यांनी केले. माय मराठी चॅनल ,अरुणा प्रकाशन व निसर्ग मंडळ आयोजित पहिल्या राज्यस्तरीय गावगाडा संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना त्यांनी हे मत मांडले. सीमावर्ती भागातील तादलापूर येथे आज आयोजित संमेलनाचे उद्घाटन अमूर्त संस्कृती संचितचे संशोधक डॉ. साहेब खंदारे यांच्या हस्ते झाले.
वाडा संस्कृतीला वाहिलेल्या या आगळ्यावेगळ्या पहिल्या साहित्य संमेलनास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. “स्वराज्य म्हणजे सत्तेचा लाभ नव्हे ही गांधीजींनी मांडलेली भूमिका आज आपल्याला पुन्हा लक्षात घेतली पाहिजे, दरवर्षी तीनशे करोड झाडं जाळली जात असताना त्याचा विचार आम्ही करणार का नाही? असा प्रश्न प्रा. मॅक्सवेल यांनी यावेळी उपस्थित केला. नैसर्गिक आपत्तीच्या विरोधात आपल्याला लढावे लागेल. याची सुरुवात साहित्याने केली पाहिजे. अशी अपेक्षा प्रा.लोपीस यांनी पुढे बोलताना व्यक्त केली.
यावेळी बोलताना रामचंद्र तिरुके यांनी गावगाड्यातील संस्कृतीचा आढावा घेत ग्रामसंस्कृती सर्वसमावेशक असल्याचे सांगितले. साहित्य माणूसकेंद्री असावे अशी अपेक्षा संमेलनाचे उद्घाटक डॉ. साहेब खंदारे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. कलांचा जन्म हा गाव गाड्यात झालेला आहे. आज मराठीच्या अभिजाततेचा डंका वाजवला जात असला तरी वेदनेची कलाकृती असणारी भाषा ही कायम अभिजातच असल्याचे डॉ. साहेब खंदारे म्हणाले. सत्याचं व सौंदर्याचं मूल्य पुन्हा सुरू करण्याची जबाबदारी गावगाडा साहित्य संमेलनावर आहे. अशा शब्दात त्यांनी या संमेलनाची उपयुक्तता व्यक्त केली. ओवी ही मराठी कवितेची जननी असल्याचे सांगून भुकेलेला भाकर, कलेला न्याय देणारा व रयत जोडणारा वाडा असल्याचे मत डॉ.खंदारे यांनी पुढे व्यक्त केले. अरुणा बिरादार, अश्विनी पाटील यांनी सूत्रसंचालन तर डॉ. सुरेश शिंदे यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. शिवशंकर पाटील, प्राध्यापक डॉक्टर कांत जाधव, राजेसाहेब कदम, प्रा अनिल चवळे यांच्यासह तादलापूर ग्रामस्थांनी केले.
संमेलनाचे उद्घाटक डॉ .साहेब खंदारे, धनंजय गुडसूरकर, शिवा अंबुलगेकर ,शिवा अंबुलगेकर, प्रा. डॉ. दीपक चिद्दरवार,प्रा‌.डा.म.ई.तंगावार, राजेसाहेब कदम,प्रा. डॉ. कांत जाधव, प्रा.अनिल चवळे, राज पाटील,राजेश्वर पाटील, बालाजी बिरादार, शेषराव पाटील, गोपाळ जाधव, सोमेश्वर पाटील, महादेव खळुरे, दिपक हालकंचे,यांच्यासह ग्रामस्थ साहित्यिक भजनी मंडळी मोठ्या संख्येने होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!