कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्यात सावत्र मुलांसह सावत्र सुना, पाच आरोपी विरुद्ध गुन्हा रद्द
कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्यात सावत्र मुलांसह सावत्र सुना, पाच आरोपी विरुद्ध गुन्हा रद्द
छत्रपती संभाजी नगर (प्रतिनिधी) : कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्यात दिरासह, आठ आरोपी विरुद्ध उच्च न्यायालयाच्या न्या. विभा कंकणवाडी , आणि न्या. रोहित जोशी यांनी गुन्हा रद्द केला आहे. थोडक्यात माहिती अशी की, सदर प्रकरणी फिर्यादी सुनेने पती, तीन सावत्र मुले, दोन सावत्र सुना, दूरचे नातेवाइकांना सुडब्द्धीने फौजदारी प्रकरणात गोवण्यासाठी चारठाणा पोलीस स्टेशन जिंतूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती, सदर फिर्यादी अंती, गुन्हा दाखल झाला होता.
सदर गुन्हा रद्द करण्यासाठी सदर आरोपीनी ऍड. अजिंक्य रेड्डी यांच्या मार्फत याचिका दाखल केली असता, सदर फिर्यादी मध्ये सर्वच आरोपीवर ढोबळ आरोप करण्यात आले असून, एकूण 6 आरोपींना सुडबुद्धी ने या तक्रारीमध्ये गोवण्यात आले. वास्तविक आरोपी हे पहिल्या पत्नी पासून झालेले मुलं आणि त्यांच्या पत्नी असून त्या लग्नापासून वेगळ्या राहतात,ही बाब उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.या आशयाचा युक्तीवाद मांडला असता,उच्च न्यायालयाने एकूण आठ आरोपीच्या विरोधातील गुन्हा रद्द केला. सदर प्रकरणी याचिकाकर्त्या तर्फे ऍड. अजिंक्य रेड्डी यांनी काम पाहिले.
