चार चाकीची दुचाकीला जोराची धडक ; एक जण जागीच ठार
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील मरशिवणी जवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वरील श्री साई पेट्रोल पंपा समोर भरधाव वेगाने येणाऱ्या चार चाकी कारने दुचाकीला दि २ मार्च रोजी सायंकाळी ०५ : ३० वाजता जोराची धडक दिली यात दुचाकी वरील इसमाचा जागीच मृत्यु झाला असुन अहमदपूर पोलीसात रात्री उशीरा पर्यंत अपघाताच्या घटनेची नोंदीची प्रक्रीया सुरू होतीयाविषयी सविस्तर माहिती अशी की, पालम तालुक्यातील बनवस येथील ज्ञानोबा मधुकर सुरनर वय ४२ वर्ष हा इसम अहमदपूर तालुक्यातील मरशिवणी जवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वरील श्री साई पेट्रोल पंपा समोरील धाब्यावर जेवण करून अहमदपूर कडे काही कामानिमित्त आपली दुचाकी क्र एम.एच २२ डब्ल्यु १२०१ घेऊन निघाला असता नांदेड कडून अहमदपूर कडे हुंडाई कंपनीची एक्सटर गाडी क्रमांक एम.एच २२ बि. सि १७०२ ही भरधाव वेगाने येत होती त्यातच दुचाकी वरील इसम ज्ञानोबा सुरनर हा श्री साई पट्रोल पंपा समोरील झेब्रा क्रॉसिंग पास करून अहमदपूर कडे येत असताना पाठीमागुन दि ०२ मार्च रोजी सायंकाळी ०५ : ३० वाजता जोराची धडक बसली असुन या धडकेत दुचाकी जवळ पास पंन्नास फुट लांब उडून रस्त्याच्या बाजूस जाऊन पडली यात दुचाकीवरील ज्ञानोबा सुरनर याचा जागीच मृत्यु झाला असुन अहमदपूर येथील शासकीय ग्रामीण रूग्णालयातील शवगृहात त्याचा मृत देह ठेवण्यात आला आहे अहमदपूर पोलीसात बातमी लिही पर्यंत सदरील अपघाताच्या घटनेची नोंदची प्रक्रिया चालु होती.
