अहमदपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी संपर्क अभियान संपन्न…!
अहमदपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी संपर्क अभियान संपन्न…!
अहमदपूर (गोविंद काळे) : राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागा अंतर्गत महाराष्ट्राच्या संपर्क दौऱ्यावर असलेले ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे यांनी अहमदपूर येथे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला लातूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून कल्याण आखाडे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. कल्याण आखाडे यांना येथील ओबीसी, एससी, मुस्लिम कार्यकर्त्यांनी संवादा दरम्यान लातूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील ओबीसी कार्यकर्त्यास पुरेसं बळ द्यावे व त्यांच्या अडीअडचणी समयी खंबीरपणे त्यांना साथ द्यावी तसेच येथील ओबीसी कार्यकर्त्यास महत्त्वाच्या कमिट्या व शासकीय कमिटीवर पदं देऊन त्यांचे हात बळकट करावे अशी प्रमुख विनंती केली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अफसर शेख हे होते तर या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक यशवंत उर्फ बाळू केंद्रे (ओबीसी जिल्हाध्यक्ष लातूर ) हे होते त्याचबरोबर प्रमुख उपस्थिती शिवानंद तात्या हिंगणे (प्रदेश सरचिटणीस ) तालुका अध्यक्ष शिवाजीराव देशमुख ,एड. आवटे (प्रदेश कार्याध्यक्ष ) श्रीकांत बनसोडे, अभय , बाळू कासनाळे ,अझहर बागवान , आशिष तोगरे, तानाजी राजे ,दयानंद पाटील, मुज्जू भाई, बारमाळे आयाज शेख, रहीम खान पठाण, प्रकाश फुलारी, चंद्रकांत गंगथडे, बाबुभाई रुईकर, गणेश , कासनाळे, राम नरवटे, संभाजी चोपणे ,आलापुरे तसेच माजी नगरसेवक आदींची प्रमुख उपस्थिती होती.
