आर्ट ऑफ लिव्हिंग आणि लातूर येथील शैक्षणिक संस्था यांच्यात सामंजस्य करार
लातूर/बेंगलोर (प्रतिनिधी) : दि. 28 फेब्रुवारी रोजी आर्ट ऑफ लिव्हिंग बेंगलोर या आंतरराष्ट्रीय संस्थेसोबत लातूर जिल्ह्यातील जयक्रांती शिक्षण प्रसारक मंडळ, नेटिझन्स फाउंडेशन स्कुल लातूर, सरस्वती विद्या विकास मंडळ, अहमदपूर आणि ब्राईट इंटनॅशनल स्कूल गंगापुर, लातूर या चार शाळा आणि आर्ट ऑफ लिव्हिंग लातूर यांच्या पुढाकारातून 8 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी उत्कर्ष योग आणि मेधा योग ही शिबिरे घेण्याचा सामंजस्य करार (MOU) अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकरजी यांच्या समक्ष करण्यात आला याचा फायदा 8000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना होणार आहे.हा करार वरील शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी अजित पाटील कव्हेकर जी, सुधाकरजी तोडकर, महेश तोडकर, आशिषजी हेंगणे, नानासाहेब शिंदे व आर्ट ऑफ लिव्हिंगचे जिल्हा समन्वयक कैलास जगताप, चिल्ड्रन आणि टीन्स शिबिरांचे जिल्हा समन्वयक सीए संदीपजी नवटक्के आणि या शिबिरांचे प्रशिक्षक अजय पाटील यांची उपस्थिती होती.
