दस्त लेखक विजयकुमार भालके यांचे दुःखद निधन
अहमदपूर दि.03.03.25 येथील ज्येष्ठ दस्त लेखक विजयकुमार विश्वनाथप्पा भालके यांचे वृद्धापकाळाने दि. एक रोज शनिवारी रात्री आठ वाजता राहत्या घरी वयाच्या 80 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्यावर दि. 02 रोजी रविवारी सकाळी अकरा वाजता अत्यंत शोकाकुल वातावरणात लिंगायत स्मशानभूमी मध्ये अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सूना, नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार असून दस्त लेखक पप्पू उर्फ काशिनाथ भालके यांचे ते वडील होत . त्यांच्या दुःखद निधनाबद्दल सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
