न.प.चा जलतरण तलाव बनला शोभेची वस्तू !

0
न.प.चा जलतरण तलाव बनला शोभेची वस्तू !

उदगिर (एल.पी.उगीले) : उदगीर नगर परिषदेकडून उभारलेला जलतरण तलाव बंद अवस्थेत असून, तो केवळ शोभेची वस्तू बनला आहे. लाखो रुपये खर्च करून उभारलेला हा तलाव तांत्रिक कारणामुळे की, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे बंद झाला आहे? यावर प्रश्नचिन्ह आहे.

शहरातील जलतरणपटूंना आणि विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळावा, अशी नागरिकांची मागणी आहे. तलाव सुरू करण्यासाठी प्रशिक्षक आणि व्यवस्थापनाबाबत निर्णय घेण्याची गरज असून, नगर परिषदेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. युवकांना संधी मिळणार की नाही, याचा निर्णय आता प्रशासनावर अवलंबून आहे.माजी नगर अध्यक्ष बसवराज बागबंदे यांनी बोलताना असे सांगितले की, प्रशासनाने दखल घेवून, लवकरच चालू करावे व नवतरुणना त्याचा लाभ होईल,असे कार्य करावे. आमच्या प्रतिनिधीशी बोलताना मुख्याधिकारी सुंदर बोंदर यानी असे सांगितले की, मागील काही दिवसा पूर्वी टेंडर काढून, ईच्छुक उमेदवारांनी चालु करण्यास मागणी केली होती. पण प्रतिसाद न मिळालेमुळे बंद आहे. लोक प्रतिनिधींनी नवीन विकास कामे करत असताना जुन्या सुविधेकडे लक्ष देवून, कार्य करावे,व सामान्य नागरिकांना अतिक्रमण मुक्त शहर, पिण्याचे पाणी, रस्ते व स्वच्छतेबाबत लक्ष देण्यास प्राधान्य देण्यात यावे, असे कळवले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!