मराठी दिन व विज्ञान दिन विद्यालयात उत्साहात साजरा

0
मराठी दिन व विज्ञान दिन विद्यालयात उत्साहात साजरा

उदगीर (एल.पी. उगीले) :राष्ट्रीय ज्ञान विकास मंडळ द्वारा संचलित सरदार वल्लभभाई पटेल विद्यालयांमध्ये मराठी दिन व विज्ञान दिन उत्साहात विद्यालयात साजरा झाला .मराठी दिन या कार्यक्रमासाठी अध्यक्ष मुख्याध्यापिका मंजुषाताई कुलकर्णी व प्रमुख वक्त्या अनुराधा धोंड उपस्थित होत्या .अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती व कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .इयत्ता सातवीतील प्रणिती राठोड व कोमल कासले यांनी अध्यक्षांचे स्वागत केले. .स्वागत गीत विद्यार्थ्यांनी गायले तसेच तक्षशिला चौधरी या विद्यार्थिनी महाराष्ट्र माझा या गीतावर नृत्य सादर केले .इयत्ता पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रजांवर कविता गायले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय गायत्री बेळकिरे या विद्यार्थिनीने केला .प्रमुख वक्ते अनुराधा धोंड यांनी मराठी दिनाविषयी सखोल अशी माहिती दिली .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु अंजली कपाळे व आभार प्रदर्शन कु अक्षता मठपती या विद्यार्थिनींने केले. विद्यालयात विज्ञान दिन निमित्य विद्यार्थ्यांकडून प्रयोग करून घेण्यात आले .या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापिका मंजुषाताई कुलकर्णी व प्रमुख वक्ते रोहित पाटील व प्रमुख उपस्थित म्हणून विद्यालयातील शिक्षिका अनुराधा धोंड, मळभागे राचम्मा व शिक्षक बालाजी रोडे उपस्थित होते .तसेच पालक मनीषाताई पाटील या सुद्धा उपस्थित होते. प्रमुख वक्ते रोहित पाटील यांनी विज्ञान दिनाची माहिती सांगितली .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीक्षा म्हेत्रे व आभार तक्षशिला चौधरी या विद्यार्थ्यांनी केले .

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!