शेतीमालाला रास्त भाव शासनाने द्यावा. – गोविंदराव भोपणीकर

0
शेतीमालाला रास्त भाव शासनाने द्यावा. - गोविंदराव भोपणीकर

उदगीर (एल.पी.उगीले) : शेतकरी अहोरात्र कष्ट करून शेती पिकवतो.शेतीत भरघोस उत्पादन होते.शेती आम्हाला भरभरून देते पण शेतकऱ्यांच्या शेतीमालाला रास्त भाव शासन देत नाही, म्हणून शेतकऱ्यांची माती शेती नाही तर शासन करते. असे विचार गोविंदराव भोपणीकर ‘शेती मातीच करणार का?’ या परिसंवादाच्या अध्यक्षीय भाषणात बोलताना व्यक्त केले. गावगाडा राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या परिसंवादात डॉ. जयद्रथ जाधव, डॉ.ज्ञानदेव राऊत, माधवराव मल्लिशे व डॉ.सचिन खडके सहभागी होते. यावेळी डॉ. जयद्रथ जाधव यांनी सांगितले की, ‘शेती बीज नेता थोडे मोटे आणिताती गाडे’ असे संत नामदेवांनी म्हटले होते.शेतीने शेतकऱ्यांची माती कधीच केली नाही. शेती भरघोस उत्पादन देते,पण शेतीमालाला रास्त भाव शासन देत नाही. त्यामुळे ही व्यवस्थाच शेतकऱ्यांची माती करते.भारत शेतीप्रधान देश आहे.शेतीमालावर देशाचे सांस्कृतिक वैभव उभारले आहे,शेती उद्योग, व्यवसायाला चालना देते.राष्ट्रीय उत्पन्नात शेतीचा वाटा मोठा आहे. पण या देशाची व्यवस्था कधीच शेतकऱ्यांच्या हिताची नाही. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाच्या विकासात शेतकऱ्यांचे मोठे योगदान राहिले आहे. धरण, रस्ते,औद्योगीकरण, शहरीकरण उभारणीत शेतकऱ्यांनी आपल्या नाममात्र मावेजा घेऊन जमिनी दिल्या. पण त्या बदल्यात शेतकऱ्यांना सरकारने काय दिले ? स्वातंत्र्यप्राप्तीपासून शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर लोक कल्याणकारी योजना राबविल्या. परंतु शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतीमालाला योग्य भाव या व्यवस्थेने दिलेला नाही.चार वर्षांपासून सोयाबीनचे बाजारभाव साडेचार हजारांच्या पुढे जात नाहीत.पण या काळात शेतीलागवडी खर्च चार पट वाढला आहे.याचा विचार सरकार करणार आहे की नाही? ही व्यवस्था उलट शेतकऱ्यांना पुस्तकी मार्गदर्शन करते. परंतु शेती निसर्गावर अवलंबून असल्याने ती पुस्तकी मार्गदर्शनाने करता येत नाही असे ते म्हणाले.

डॉ.ज्ञानदेव राऊत म्हणाले की,१९८६ ची साहेबराव करपेची पहिली आत्महत्या शासनाच्या बेदखल वृत्तीतून झाली. शेतकऱ्यांना शेती मधून त्याच्या जगण्या इतकेही पैसे मिळत नाहीत.प्राथमिक गरजाही भागत नाहीत. म्हणून आजचा शेतकरी आत्महत्या करतो आहे. म्हणजे ही व्यवस्था शेतकऱ्यांचे खून कशी पाडते आहे याचे दाखले कविता, कादंबरीतून दिले.शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते माधवराव मल्लिशे म्हणाले की, आज नागरी समाजाच्या संवेदना बोथट झाल्या आहेत. तुम्ही पिकवत राहा पण भाव मागू नका अशी आजची स्थिती आहे. जगाचा पोशिंदा शेतकरी आत्महत्या करतो आहे. सरकारचे धोरण हेच शेतकऱ्यांचे मरण आहे. डॉ.सचिन खडके यांनी महात्मा फुले यांच्या संकल्पनेतील ग्रामविकास व राजकारण आज नाही.देशाला जगवणारा शेतकरी आज आत्महत्या करतो आहे पण याचे भान व्यवस्थेला नाही.कृषिप्रधान अर्थव्यवस्था निर्माण करण्यात देश अपयशी ठरला आहे.या परिसंवादाला गावगाडा संमेलनाचे अध्यक्ष मॅक्सवेल लोपीस, उद्घाटक डॉ. साहेबराव खंदारे, ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. शेषराव मोहिते,ज्येष्ठ कवी प्रभाकर साळेगावकर, डॉ.मुकुंद राजपंखे,विद्या परिषदेचे सदस्य डॉ. नारायण कांबळे, अनंत कदम, साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य श्री.धनंजय गुडसूरकर, राजेसाहेब कदम, अनिल चवळे, शिवशंकर पाटील, राजकुमार बिराजदार उपस्थित होते. परिसंवादाचे सूत्रसंचालन डॉ कांत जाधव यांनी केले तर आभार डॉ.दीपक चिद्दरवार यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!