उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालय यांचे वतीने जागतिक महिला दिनानिमित एकल महिला मेळाव्याचे आयोजन
अहमदपूर (गोविंद काळे) : जागतिक महिला दिनानिमित्त समाजातील ज्या ज्या एकल महिला आहेत त्यात विधवा, परितक्त्या महिला संदर्भात कार्यक्रम आयोजित केला आहे. पतीच्या मृत्युनंतर मुलांच्या पालन पोषणाबरोबरच संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी डोक्यावर घेऊन प्रतिकूल परीस्थीतीत हिम्मत न हारता मोठ्या कष्टाने कौटुंबिक जबाबदारी यशस्वीपणे सांभाळणाऱ्या महिलांचा मनोदय वाढविण्याचा दृष्टीने एका छोट्याश्या कार्यक्रम राबविण्यात येत असून त्यामध्ये सदर महिलांना वेगवेगळ्या विभागामार्फत ज्या योजना दिल्या जातात. त्या योजनांचा लाभ कार्यक्रमादरम्यान करून देण्याचा मानस असून सर्व विभागांचा त्यात सहभाग असणार आहे. ज्या परिस्थितीमध्ये ध्या महिला जोवन जगतात त्यातून काही प्रमाणात त्यांना योजनांच्या माध्यमातून त्यांचे जीवन सुकर करण्याच्या उद्देशाने आणि अनेक गोष्टीचे ज्ञान त्यांना नसल्यामुळे ज्या योजना त्याच्या पर्यंत अद्याप पोहचल्या नाहीत त्या त्यांना उपलब्ध करून देण्याचा देखील या कार्यक्रमाचा उद्देश आहे. या मध्ये तहसील प्रशासन, पोलीस प्रशासन, पंचायत समिती व त्याअंतर्गत येणारे विविध, कृषी विभाग तसेच तालूक्यातील इतर विभागाचा देखील सहभाग राहणार आहे.सदरील मेळावा हा पार्वती मंगल कार्यालय, थोडगा रोड, अहमदपूर येथे दि. 04.03.2025 रोजी सकाळी 11.00 वाजता मा. वर्षा ठाकूर घुगे जिल्हाधिकारी, लातूर यांचे अध्यक्षेत खाली पार पाडण्यात येणार आहे. तरी एकल महिला यांनी मोठ्यासंख्येने सदर कार्यक्रमास उपस्थित राहणे बाबतचे अवाहन कार्यक्रमाचे आयोजक श्रीमती डॉ. मंजुषा लटपटे उपविभागीय अधिकारी, अहमदपूर व श्रीमती उज्वला पांगरकर तहसीलदार अहमदपूर यांनी केले आहे.
