दुर्मिळ साहित्यांचा प्रदर्शनातून ग्रामीण जीवनाचे दर्शन
दुर्मिळ साहित्यांचा प्रदर्शनातून ग्रामीण जीवनाचे दर्शन
‘गावगाडा’ साहित्य संमेलनात ग्रामीण जीवनातील जीवनावश्यक वस्तूंचे प्रदर्शन
तादलापूर येथे ‘गावगाडा’ साहित्य संमेलनात भरविले वस्तूंचे प्रदर्शन
अहमदपूर (गोविंद काळे) : माय मराठी,अरुणा प्रकाशन आणि निसर्ग मंडळ आयोजित कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नागरी, तादलापूर येथे पहिले गावगाडा राज्यस्तरीय एकदिवसीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले.
कर्नाटक व महाराष्ट्र राज्याच्या सीमावर्ती भागातील तादलापूर येथे आयोजित गावगाडा संमेलनात ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवण्यासाठी 100 वर्षापूर्वीच्या वापरात असणारे दुर्मिळ वस्तूंचा प्रदर्शन भरविण्यात आले.
ग्रामीण भागात महिला सकाळीच उठून जात्यावर दळण दळायचे.फिरत्या चक्रावरती दळताना महिला गाणी, ओव्या गात असत ही गाणी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोहोचत होते.पूर्वी ग्रामीण जीवनाची पहाट या जात्याच्या ओव्याने सुरु होत असत.अन्नधान्य जात्यावर दळले जायचे व जात्यावर दळलेल्या ज्वारीच्या भाकरीची जव, दाळीची चव मिळणे हे दुर्मिळ नव्हे तर नाहीसेच झाल्यात जमा आहे. दळणाचे जाते,खलबत्ता, मुसळ, जुन्या आठवणी जपत घराच्या एखाद्या कोपऱ्यात पडलेले पहायला मिळते.काही ठिकाणी एखाद्या शुभप्रसंगात देवा बरोबर आजही जात्याची पुजा केली जाते. याची जाणीव होण्यासाठी जातो या ठिकाणी ठेवण्यात आले.
ताक घुसळण्याचे उत्तम साधन म्हणजे रवी होय.रवी हे साधन पुर्वी लाकडापासून बनवित असत. हा पण सध्या दुर्मिळ झाला आहे.पुरातन काळात पाककृती साठी महत्वाचे साधन म्हणून खलबत्त्याची ओळख आहे. याची जागा पुर्णपणे मिक्चरने घेतले आहे.भाकरीचे पीठ मळण्याची कान असलेली लाकडी परात म्हणजे काटवट…. हे सुद्धा वस्तू नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.अंघोळीसाठी वापरले जाणारे भांडे घगांळ,पूर्वी बांबूपासून बनविण्यात येणाऱ्या वस्तूंना अधिक मागणी होती. त्यात सूप, टोपली, दुरडी,या वस्तू चा सरास वापर होता.आज हे वस्तू ग्रामीण भागात तुरळकच पहावयास मिळत आहेत.धान्य मोजमाप करण्यासाठीची जुने माप म्हणजे पायली,आदली
मापट,पाव शेर,कोळव,निळव हे सुद्धा आज पहायला मिळत नाही.ग्रामीण भागात आढळणारी खाली मोठे डेरेदार मडके आणि त्यावर मग आकाराने छोटेछोटे होत गेलेले मडके ठेवण्याची एक पद्धत म्हणजे उतरंड होय. यात धान्य, पापड कुरुड्या ठेवली जात असत.हे पुर्णपणे नामशेष होत आहे.सर्व प्रकारचे धान्य, गहू बाजरी इत्यादी पाखडण्यासाठी सुप वापरत असत.पूर्वी सुपाला गायीचे शेणाने सारवत असत. सारवल्यानेबेताच्या काडयांचे बारीक चिद्रे बुजतात. त्यातन केरकजरा बाजूला काढले जाणारे उत्तम साधन म्हणून सुपाचा वापर होत असे.पूर्वी शेतीसाठी वापरली जाणारी अवजारे म्हणजे नांगर, वखर, डवरा, तिफण, गोफण, औत किंवा अऊत, विळा, दातुळ, कुदळ, विळा हे सुद्धा या प्रदर्शनात ठेवण्यात आली होती.शेतमाल वाहण्यासाठी,लग्नाला वऱ्हाड घेऊन जाण्यासाठी,प्राचीन काळापासून बैलगाडीचा वापर केला जात होता. या ठिकाणी बैलगाडीचा चाक सुद्धा ठेवण्यात आला होता.सागवाणी पैसे ठेवण्याचा सावकारांचा गल्ला,रात्रीच्या वेळी अंधार घालविण्यासाठी घराघरांमध्ये कंदील, चिमण्या तसेच रॉकेलबत्तींचा वापर केला जात होता. अशा विविध प्रकारच्या चिमण्या ठेण्यात आले होते.
वावडी, डाल, सरत, जू,फास, बैलपोळ्याला बैलाचा अंगावर घातले जाणारे झूल,गोधडी, वाकळ इत्यादी वस्तू ठेवण्यात आले.
संमेलनाचे अध्यक्ष प्रा. मॅक्सवेल लोपीस उद्घाटक संशोधक डॉ. साहेब खंदारे यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे रामचंद्र तिरुके, स्वागताध्यक्ष जयवंतराव पाटील, डॉ.अंजुम कादरी, श्यामाप्रसाद धनुरे, प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवशेटवार यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
या प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी प्रा. शिवशंकर पाटील, महादेव खळुरे,दीपक हालकांचे,कपिल बिरादार,मंगलबाई पाटील, विद्यावती बिरादार, शिवम अक्का बिरादार ,महानंदा पाटील ,श्याम तोंडारे, ज्ञानेश्वर बिरादार, अश्विनी पाटील ,अरुण जाधव, शेषराव पाटील ,शिवाजी बिरादार,बालाजी बिरादार ,महेंद्र बिरादार, धनराज तोंडारे, प्रशांत बिरादार, राजकुमार म्हेत्रे,सतीश देवर्षी, तुकाराम देवर्षी, भगवान गुरुजी, बालाजी बिरादार ,आनंद देवर्षे अभंग बिरादार ,गोविंद बिरादार,तात्याराव देवर्षी,शारदा बिरादार, भीमाशंकर बिरादार,धनराज कांबळे ,पप्पू गायकवाड,विश्वनाथ कांबळे , कोतवाल विश्वनाथ यांच्यासह तादलापूर ग्रामस्थांनी योगदान दिले.
पाटलांच्या वाड्यासमोर ‘गावगाडा’साहित्य संमेलनात प्रमुख आकर्षण म्हणून गंगाळ, मुसळ, काटवट, तिवई,चाळणी,सूप, रवी,मातीचे चूल, उतरंड जातं, घुम्म, चुगंड, पयली,शेर, चिप्ट, कोळव, निवळ,गल्ला,चाक, घोंगडी,वाकळ,बैलाचे झुल, जु,चिमणी, कंदिल,बळीराम नांगर,कोळप,घडी,तिप्पण,सरत,वावडी,डाल,दुरडी इत्यादी लोप पावत चाललेली पूर्वीच्या काळातील जीवनशैलीचा संग्रह प्रदर्शनात ठेवण्यात आला होता. यातून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापररातून जुन्या वस्तूंचा ऱ्हास होणे, याबाबत चिंतन करणे आवश्यक आहे हे या प्रदर्शनातून बोध घेता येईल.
-राज्यपुरस्कार प्राप्त कला शिक्षक महादेव खळुरे
