शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी शिवसैनिक यांची राज्य परिवहन मंडळास भेट

0
शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी शिवसैनिक यांची राज्य परिवहन मंडळास भेट

शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी शिवसैनिक यांची राज्य परिवहन मंडळास भेट

अहमदपुर (गोविंद काळे) : शहरातील राज्य परिवहन आगारांना शिवसेना शिंदे गट पदाधिकारी यांनी दि ३ मार्च रोजी सकाळी अचानक भेट देत परिवहन महामंडळात उपलब्ध सेवा सुविधांची पाहणी केली तसेच अहमदपूर आगार प्रमुख अमर पाटील यांची भेट घेऊन संपुर्ण आगाराची पाहणी करण्यात आली असुन महिला सुरक्षा , सुविधा विकास कामे व प्रवाशांच्या समस्या सविस्तर जानुन घेण्यात आल्या.

मागील काही दिवसांपासून राज्य परिवहन आगारांमध्ये खासकरून महिलांना प्रचंड गैरसोईचा सामना करावा लागत असल्याचे निदर्शनास आले आहे. या करिता राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शिवसेना पदाधिकारी यांची प्रत्यक्ष बैठक झाल्यानंतर शिवसेना महिला आघाडीच्या वतीने राज्यभरातील राज्य परिवहन मंडळाच्या आगारांमध्ये उपलब्ध असलेल्या सोई सुविधांचा आढावा घेण्याच्या सुचना केल्या होत्या.
विद्यमान महायुतीच्या सरकारमध्ये शिवसेनेकडेच परिवहन विभाग असल्याने महिला व प्रवासी तक्रारी / सुचनांवर तातडीने प्रशासकीय कार्यवाही करण्यात येणार आहे. महिला संपर्कप्रमुख रंजनाताई कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख प्रिती कोळी, महिला तालुका प्रमुख सुवर्णा रोकडे, महिला शहरप्रमुख पूजा जाधव. रेश्मा होळकर महिला आघाडीच्या सर्व महिला पदाधिकारी, शिवसेना माजी उपजिल्हा प्रमुख गणेश पांचाळ, शिवसेना तालुका प्रमुख गोपीनाथ जायभाये, शिवसेना शहरप्रमुख लक्ष्मण अलगुले व शिवसैनिकांनी अहमदपुर आगारामध्ये दि ३ मार्च रोजी सकाळी बसस्थानकांला अचानक भेटी देत स्थानिक प्रशासकीय आधिकारी / कर्मचाऱ्यांच्या सोबतीने त्याठिकाणी असलेल्या सोईसुविधांची पाहणी केली. आगार प्रबंधक यांनी माहिती दिली सदर भेटीत शिवसेना पदाधिकारी यांनी उपलब्ध सेवा-सुविधा व महामंडळातील विकास कामांची पडताळणी केली.

महिला प्रवाश्यांकरिता करिता स्वच्छ व सुरक्षित स्वच्छतागृह, स्तनदा मातांकरिता हिरकणी कक्ष असल्यास संख्या / स्थिति
विकलांग प्रवाश्यांकरिता सहज-सुलभ प्रवेश व प्रतीक्षा / विश्रामाची जागा महिला अधिकारी / कर्मचाऱ्यांकरिता स्वच्छ व सुरक्षित स्वच्छतागृह व विश्रामाची जागा महिला अधिकारी / कर्मचाऱ्यांकरिता विशाखा समितीची स्थापना व समितीतील संबंधितांची संपर्कासह दर्शनी भागात माहिती. स्वच्छ पिण्याचे पाणी व नीटनेटके खानपान स्वच्छता ग्रहाची शिवशेना पदाधिकारी यांनी पाहणी करून सुचना केल्या.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!