दुचाकीची मालवाहु चार-चाकी टाटा एसला पाठीमागुन जोराची धडक ; २६ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यु

0
दुचाकीची मालवाहु चार-चाकी टाटा एसला पाठीमागुन जोराची धडक ; २६ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यु

दुचाकीची मालवाहु चार-चाकी टाटा एसला पाठीमागुन जोराची धडक ; २६ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यु

अहमदपूर (गोविंद काळे) : शहरपासुन जवळच असलेल्या राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या भक्तीस्थळा जवळील कासनाळे पेट्रोल पंपासमोर राष्ट्रीय महामार्ग क्र ३६१ वर एका दुचाकीने मालवाहु चार चाकी टाटा एसला पाठीमागुन जोराची धडक दिली यात दुचाकी वरील एका २६ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यु झाला असुन एक जण गंभीर जखमी झाला असल्याची दुर्देवी घटना दि ३ मार्च रोजी संध्याकाळी ०७ : ३० वाजता घडली आहे

याविषयी सविस्तर माहीती अशी की, रवि परशुराम राठोड वय २६ वर्ष रा लिंबोटी तांडा ता लोहा येथील युवक आपल्या मित्रा सोबत काही कामानिमित्त अहमदपूर येथे आला होता तो आपले काम आटोपून अहमदपूर कडून गावाकडे लिंबोटी तांडा ता लोहा येथे दुचाकी क्र एम.एच २२ एयु ५४४६ वरून आपल्या मित्रा सोबत जात असताना राष्ट्रीय महामार्ग क्र ३६१ वरील राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्च महाराज भक्तीस्थळा जवळील कासनाळे पेट्रोल पंपा समोर डिझेल संपल्यामुळे रस्त्याच्या बाजुला थांबल्या असलेल्या मालवाहु चार -चाकी टाटा कंपनीचा एस क्र एम एच १४ ई.एम ९२८५ ला दि ३ मार्च रोजी ०७ : ३० वाजता पाठीमागून जोराची धडक दिली यात दुचाकी वरील २६ वर्षीय युवक रवि राठोडचा जागीच मृत्यु झाला असुन पाठीमागे बसलेला मित्र गंभीर जखमी झाला आहे त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालय लातुर येथे पाठवण्यात आले आहे. सदरील अपघाताच्या घटनेची अहमदपूर पोलीसात नोंद करण्यात आली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!