बळजबरीने घरात घुसुन महिलेसह पतीला बेदम मारहाण ; चौघांविरूध्द गुन्हा दाखल

0
बळजबरीने घरात घुसुन महिलेसह पतीला बेदम मारहाण ; चौघांविरूध्द गुन्हा दाखल

बळजबरीने घरात घुसुन महिलेसह पतीला बेदम मारहाण ; चौघांविरूध्द गुन्हा दाखल

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील लेक्चर कॉलनीतील एका महीलेला लातुर येथील चौघांनी बळजबरीने घरात शिरून घरातील ५० हजार रूपयांच्या सामानाची मोड तोड करून महीलेसह पतीला बेदम मारहाण केली असल्याची घटना दि १ मार्च रोजी दुपारी ०१ : ४५ वाजता घडली असुन महीलेच्या फिर्यादी वरून अहमदपूर पोलीसात सदरील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

याविषयी सविस्तर माहीती अशी की वंचला नारायण वाघमारे वय ५३ वर्षे व्यवसाय-घरकाम रा. लेक्चर कालनी अहमदपूर ता अहमदपुर जि लातुर यांनी अहमदपूर पोलीसात फिर्याद दिली आहे की, मला पती व दोन मुले दोन मूली असा परीवार असुन माझे पती पेन्शन धारक आहेत. आमच्या कुंटुबाची उपजिवीका आम्ही पेन्शन वरच भागवितो माझी दोन नंबर ची मूलगी आंबिका उर्फ अंजली नितीन वाघमारे वय ३४ वर्ष हीचे लग्न रिती रिवाजाप्रमाणे गेल्या ११ वर्षा पूर्वी नितीन नारायण वाघमारे रा. राम नगर औसा रोड लातूर यांचेशी लावून दिले लग्नानंतर माझे मूलीला आतापर्यत तिचे सासरचे लोकांनी चांगली वागणूक दिली नाही. आम्ही आज ना उद्या ते लोक सूधारतील म्हणून वाट पाहीली पंरतू त्याचेमध्ये काही फरक पडला नाही.

दि. o१.०३.२०२५ रोजी ०१.४५ वाजण्याचे सुमारास मूलगी आंबिका हिचे सासरचे १. नितीन नारायण वाघमारे २. नारायण दिंगबर वाघमारे ३. शंकूतला नारायण वाघमारे ४. निखील नारायण वाघमारे सर्व राहणार. राम नगर आसा रोड लातूर हे माझे घरी आले व आम्हाला घराचे दार काढण्यासाठी फोन केला म्हणून आम्ही त्यांचा आवाज ओळखून घराचे दार काढले वरील सर्व लोक घरात येवून निखील नारायण वाघमारे यांने लोखंडी रॉडने टिव्ही, व घरातील शो केस फोडला व त्यांने माझ्या केसाला पकडुन मला भिंतीवर आदळले व माझ्या डोक्यात लोखंडी रॉड जोरात मारला त्यामूळे माझे डावे कानाच्या वरचे बाजूस डोक्यात जखम होवून रक्त निघाले तसेच माझे पती नारायण ग्यानोबा वाघमारे आंनद नारायण वाघमारे यांना नितीन नारायण वाघमारे, नारायण दिंगबर वाघमारे निखील नारायण वाघमारे यांनी धका बूक्की करून मारहणा करून जिवे मारण्याची धमकी दिली तसेच शंकुतला नारायण वाघमारे हीने आम्हाला शिवीगाळ केली वरील लोकांनी भांडण तक्रारी मध्ये घरातील सामानाची तोडफोड करून अंदाजे ५०, ०००/-रूपयाचे नूकसान केले आहे असल्याची फिर्याद दिली असुन १. नितीन नारायण वाघमारे २. नारायण दिंगबर वाघमारे ३. शंकूतला नारायण वाघमारे ४. निखील नारायण वाघमारे यांच्या अहमदपूर पोलीसात भारतीय न्यायसंहिता बि. एन.एस २०२३ कलम ११८ ( १ ),३२४ ( ४ ), ३२४ ( ५ ), ३५२, ३५१( २ ), ३५१ ( ३ ), ३ ( ५ ) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!