विद्यार्थी हक्क कृती समितीच्या पुणे जिल्हा कार्यकारिणीची घोषणा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न
विद्यार्थी हक्क कृती समितीच्या पुणे जिल्हा कार्यकारिणीची घोषणा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न
पुणे (प्रतिनिधी) : 2 मार्च 2025 – महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या न्याय व हक्कांसाठी कार्यरत असलेल्या विद्यार्थी हक्क कृती समितीच्या पुणे जिल्हा कार्यकारिणीची निवड व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे येथे आयोजित या विशेष सोहळ्याला राज्यभरातील विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि मान्यवरांची उपस्थिती लाभली.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समिती कटिबद्ध
विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी लढा देण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या विद्यार्थी हक्क कृती समितीच्या भविष्यातील कार्यपद्धतीबाबत संस्थेचे संस्थापक सचिव रामराजे तानाजीराव काळे यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “विद्यार्थ्यांना शिक्षण, रोजगार, उद्योग, क्रीडा, आरोग्य, सामाजिक न्याय आणि नेतृत्व विकास या क्षेत्रांत संधी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या क्षमतेची जाणीव ठेवून समाजाच्या प्रगतीसाठी पुढे आले पाहिजे.”
कार्यक्रमात सुप्रसिद्ध उद्योजक आणि लेखक शरद तांदळे यांनी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “परिस्थितीनुसार बदल स्वीकारणे महत्त्वाचे आहे. आपल्याला रोज उठून आवडणारे कार्य करावे वाटणे हीच खरी यशस्वीतेची गुरुकिल्ली आहे.”
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि पुणे जिल्हा कार्यकारिणीची घोषणा
या सोहळ्यात विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच, विद्यार्थी हक्क कृती समितीच्या पुणे जिल्हा कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली.
पुणे जिल्हा कार्यकारिणी:
• अथर्व ऊर्फ गणेश संतोष जाधव – पुणे जिल्हाध्यक्ष
• आशिष धनराज पाटील – पुणे जिल्हा कार्याध्यक्ष
• रोहन राजेसाहेब फुलारे – पुणे जिल्हा उपाध्यक्ष
• शुभम आबासाहेब ढगे – पुणे जिल्हा महासचिव
• आदित्य शशिकांत पवार – पुणे जिल्हा सरचिटणीस
• प्रथमेश संतोष यादव – पुणे जिल्हा सचिव
• रोहित सोनकांबळे – पुणे जिल्हा प्रवक्ता
• संदीप विलास रायबोले – पुणे जिल्हा संघटक
पुणे जिल्हा युवती कार्यकारिणी:
• ऐश्वर्या सुभाष दळे – युवती पुणे जिल्हाध्यक्षा
• हिराल पटेल – युवती पुणे जिल्हा कार्याध्यक्ष
• आदिती धडम – युवती पुणे जिल्हा उपाध्यक्ष
• नम्रता देवकाते – युवती पुणे जिल्हा महासचिव
• प्राची जगताप – युवती पुणे जिल्हा सचिव
• प्राची व्यवहारे – युवती पुणे जिल्हा संघटक
• ऋतुजा चौधरी – युवती पुणे जिल्हा सरचिटणीस
• अंजली जगदाळे – युवती पुणे जिल्हा प्रवक्ता
कार्यक्रमाला मान्यवरांचा उपस्थिती लक्षणीय
या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून शरद भाऊ तांदळे यांनी मार्गदर्शन केले, तर प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगपती पराग मामा मते, राजकुमार धुरगुडे पाटील, दीनेश कदम, बाळासाहेब रास्ते, तसेच महाराष्ट्र युवा महासंघचे अध्यक्ष डॉ. सुदर्शन घेरडे, संस्थेचे संस्थापक सचिव रामराजे काळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अभिषेक अवचार यांनी केले.
विद्यार्थ्यांसाठी नव्या संधींचे द्वार उघडणार!
विद्यार्थी हक्क कृती समितीच्या नवीन कार्यकारिणीच्या निवडीनंतर सर्वांनी समितीच्या उद्दिष्टांसाठी समर्पित राहण्याचा निर्धार व्यक्त केला. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी प्रगतीचे नवे दालन खुले झाल्याचा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.
