इनरव्हील क्लबने स्मशानभूमी व बसस्थानकात दिली सिमेंटची बाके
उदगीर (एल.पी.उगीले) येथील
इनरव्हील क्लबच्या वतीने येथील स्मशानभूमी व बसस्थानकात येणाऱ्या लोकांना बसण्यासाठी सिमेंटची बाके दिली आहेत.
या बाकांचा लोकार्पण सोहळा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त विश्वनाथ मुडपे गुरुजी, उदगीर बस आगाराचे सहाय्यक वाहतुक निरीक्षक रविकांत कांबळे, वाहतूक नियंत्रक दीपक कांबळे, ज्येष्ठ चालक जयवंत पाटील , वाहक संतोष पावले, व्ही. एस. कुलकर्णी, गोविंद गायकवाड, सूर्यकांत मुंडे, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा मानसी चन्नावार , उपाध्यक्षा अश्विनी देशमुख, सचिव पल्लवी मुक्कावार, कोषाध्यक्ष मीरा चंबुले, माजी अध्यक्षा स्वाती गुरुडे, सदस्य रोहिणी चाटे, स्वाती बिरादार, कल्पना चौधरी,अलका येरोळकर, ,सुप्रिया महाजन,स्वाती जेठुरे,दिपा कुलकर्णी, पुजा मुडपे, नंदिनी निटुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
