स्व. संतोष देशमुख यांच्या क्रुर हत्येच्या निषेधार्थ सकल मानव जात यांच्या वतीने अहमदपूरात माणुसकीचा मोर्चा

0
स्व. संतोष देशमुख यांच्या क्रुर हत्येच्या निषेधार्थ सकल मानव जात यांच्या वतीने अहमदपूरात माणुसकीचा मोर्चा

स्व. संतोष देशमुख यांच्या क्रुर हत्येच्या निषेधार्थ सकल मानव जात यांच्या वतीने अहमदपूरात माणुसकीचा मोर्चा

अहमदपूर (गोविंद काळे) : मत्साजोगचे सरपंच स्व.संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी गावगुंडानी अपहरण करुन क्रूर हत्या केली होती. त्या हत्येची प्रसारमाध्यमात फोटो व्हायरल झाल्या होत्या. महाराष्ट्र सुन्न करणाऱ्या या घटनेचा निषेध म्हणून अहमदपूरात सकल मानव जात यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दि.५ मार्च रोजी मोर्चा काढण्यात येऊन उपजिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

बीड जिल्हयातील मत्साजोगचे सरपंच स्व.संतोष देशमुख यांची आवादा कंपनीच्या पवनचक्की खंडणी प्रकरणामधून तीन महिन्यापूर्वी बीड जिल्हयातीलच काही गावगुंडानी अपहरण केले होते. ते ऐवढयावरच न थांबता अमाणूषपणे मारहाण करून क्रुरपणे निघृण हत्या केली होती. दोन दिवसांपूर्वी सीआयडीने कोर्टात सादर केलेल्या आरोपपत्रातील देशमुख यांना मारहान करतानाचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झालेले होते. ते फोटो पाहून राज्यभरामधून संताप व्यक्त केला जात आहे.
महाराष्ट्र सुन्न करणाऱ्या व प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये हे फोटो पाहुण अश्रु येणाऱ्या घटनेचा निषेध म्हणून सकल मानव जात यांच्या वतीने अहमदपूरात माणुसकीच्या मोर्चाचे दि. ५ मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजन करण्यात येऊन आरोपीच्या फोटोंना जोडे मारो आंदोलन करण्यात आले. त्यानंतर विविध मागण्याचे निवेदन उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.

उपजिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनामध्ये १ ) स्वः संतोष देशमुख यांची क्रुर हत्या प्रकरण ‘फास्ट स्ट्रॅक’ कोर्टात चालवून लवकारात लवकर आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी. २) या प्रकरणातील मुख्य सुत्रधार धनंजय मुंडे यास सह-आरोपी करण्यात यावे. 3) या संपूर्ण प्रकरणात पोलिसांची भूमिका सुद्धा संशयास्पद असून दोषी असणाऱ्या पोलिसांची चौकशी करून बडतर्फ करावे.४) परभणी येथिल पोलिस अत्याचाराचे बळी ठरलेले सोमनाय सुर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा दयावी.५) परळी येथिल मयत महादेव मुंडे व इतर अनेक प्रकरणे तपासा अभावी प्रलंबीत आहेत, या सर्व प्रकरणांची फेरतपासणी करून गुन्हेगारांना शिक्षा ‌द्यावी. ६) शिवद्रोही प्रशांत कोरटकर व राहूल सोलापूरकर यांना महाराष्ट्रातून हट्ट‌यार करावे. वरील सर्व मागण्या मान्य कराव्या अन्यथा महाराष्ट्र भर आंदोलने पुकारण्यात येतील असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी प्रा. गोविंद शेळके , प्रा. रोहीदास कदम, सिद्धार्थ कुमार सुर्यवशी, जयराम पवार, भिमराव कदम , सत्तार शेख, सुप्रिय बनसोडे, मुकेश पाटील आदींची समयोचित भाषणे झाली.
उपविभागीय कार्यलयात दाखल केलेल्या निवेदनावर प्रा. गोविंद शेळके, प्रा. रोहीदास कदम, सिद्धार्थ कुमार सुर्यवशी, जयराम पवार, भिमराव कदम, सत्तार शेख, सुप्रिय बनसोडे, प्रा. दत्ता गलाले, मुकेश पाटील, शिवशंकर लांडगे, ज्ञानोबा भोसले, सिध्दार्थ दापके, दत्ता भाऊ कदम आदी सह सुमारे शंभर जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!