प्रभारी सहा पोलीस अधिक्षक सागर खरडे यांची दमदार कामगिरी; तीन अवैद्य वाळूचे हायवा पकडून ६० लाख ७५ हजाराच्या मुद्देमालासह ६ जणांवर गुन्हा दाखल
प्रभारी सहा पोलीस अधिक्षक सागर खरडे यांची दमदार कामगिरी; तीन अवैद्य वाळूचे हायवा पकडून ६० लाख ७५ हजाराच्या मुद्देमालासह ६ जणांवर गुन्हा दाखल
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील अवैद्य धंद्याला आळा घालण्यासाठी लातुर जिल्हा पोलीस अधिक्षक सोमय मुंडे अप्पर पोलीस अधिक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी मनिष कल्याणकर प्रशिक्षणार्थी प्रभारी पोलीस अधिक्षक सागर खरडे यांना मिळालेल्या गुप्त माहीतीनुसार अहमदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैद्य वाळू वाहतुक करणारे ३ हायवा टिप्पर पकडून ६० लाख ७५ हजार हजाराच्या मुद्देमालासह ६ आरोपीवर गुन्हा दाखल करून मुद्देमाल जप्त करून हायवा ताब्यात घेऊन विविध कलमान्वये अहमदपूर पोलीसात दि ४, ५ मार्च रोजी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याविषयी सविस्तर माहीती अशी की लातुर जिल्ह्यातील अवैद्य धंद्याचे समुळ उच्चाटन करण्यासाठी लातुर जिल्हा पोलीस अधिक्षक सोमय मुंडे अप्पर पोलीस अधिक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी मनिष कल्याणकर प्रशिक्षणार्थी प्रभारी सहाय्यक पोलीस अधिक्षक सागर खरडे अहमदपूर यांनी वेगवेगळ्या पथकाची निर्मिती करुन दि ४ व ५ मार्च रोजीच्या रात्री गस्तीवर पाठवले असता गोपनीय माहीतीच्या आधारे
दि ४ मार्च रोजी पहाटे ०६ : ०० वाजण्याच्या सुमारास अहमदपूर हाडोळ्ती मार्गावरील हिप्पळगावच्या पुलावर एक अवैद्य वाळू वाहतुक करणारा हायवा तसेच दि ५ मार्च रोजी काळेगाव रोड अहमदपूर येथे सकाळी ०८ : १५ वाजता व त्याच दिवशी संध्याकाळी o७ : ०० वाजता सांगवी फाटा नांदेड रोडवर अशे दोन अवैद्य वाळू भरलेले हायवा पकडण्यात आले या दमदार कामगीरीमध्ये दोन दिवसात तीन अवैद्य वाळू वाहतुक करणारे हायवा पकडण्यात आले असुन अवैद्य वाळू व हायवा सहीत ६० लाख ७५ हजाराच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन पोह तय्यब मुमताज शेख व पोकॉ रूपेश बालाजी कज्जेवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १.अरूण सुधाकर गुट्टे वय ३३ वर्ष रा हनुमान टेकडी अहमदपूर, २. संतोष सतिष शेळके रा कोकणगा ३. माधव ज्ञानोबा होळकर वय ३२ वर्ष रा शेंद्री सुनेगाव ४. सखाराम बाजगीर रा लेक्चर कॉलनी अहमदपूर ५. चक्रधर दिलीप बुधवारे वय ३१ रा कोळवाडी ६. विजय पाटील रा परचंडा सर्व आरोपी ता अहमदपूर जि लातुर येथील रहिवाशी असुन यांच्यावर अहमदपूर पोलीसात भारतीय न्याय संहिता बि.एन.एस गुरन नं १३७, १४१ ,१४४ / २०२५ कलम ३०३ ( २ ), ३ ( ५ ) पर्यावरण अधिनियम १५ नुसार दि ४ व ५ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रभारी प्रक्षिक्षणार्थी सहा पोलीस अधिक्षक सागर खरडे यांचे सर्व स्तरातुन कौतुक होत असुन अवैद्य धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.
अहमदपूर तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच अवैध धंदे यांना लगाम घालण्यासाठी सुजाण जनतेने ९७६२१६८७८० या हॉट्अप नंबर वर संपर्क करावा किंवा संदेश पाठवावा आपले नाव गुपीत ठेवण्यात येईल असे आवाहन प्रभारी प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलीस अधिक्षक सागर खरडे यांनी केले आहे.
